S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

ऊस दराच्या मुद्द्यावरून पंढरपुरचे ऊस उत्पादक रस्त्यावर

पंढरपूर-पुणे रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर काल रात्री तालुक्यातील भांडीशेगाव येथे कोयत्याने फोडण्यात आले

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 6, 2017 11:36 AM IST

ऊस दराच्या मुद्द्यावरून पंढरपुरचे ऊस उत्पादक रस्त्यावर

पंढरपूर,06 नोव्हेंबर:  सांगली आणि कोल्हापूरमध्ये एफआरपी अधिक 200 रुपये, असा ऊसाचा भाव मान्य झाला असला, तरी सगळीकडे हा दर लागू झाला नाही.  यामुळेच पंढरपुरातले  ऊस उत्पादक ऊस दराच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरले आहेत.

एफआरपीसह दोनशे रुपयांचा भाव  काल ऊसाला मंजूर करण्यात आला आहे. हा भाव दोन टप्प्यात मिळणार आहे.  पण हे दर सगळीकडे लागू झालेले नाहीत.सांगली कोल्हापूर,पुणे पट्ट्यातच लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे  गेल्या दोन दिवसांपासून 3400 रूपये ऊस दर मिळावा या मागणीसाठी पंढरपूर परिसरातले  ऊस उत्पादक आक्रमक झाले आहेत. परिसरातील ऊस वाहतूक अडवण्यात आली आहे. पंढरपूर-पुणे रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर काल रात्री तालुक्यातील भांडीशेगाव येथे कोयत्याने फोडण्यात आले.काही दिवसांपूर्वी ट्रॅक्टरमधील हवा सोडून इंदापुरमध्ये अशाच प्रकारे आंदोलन करण्यात आले होते. बाकीच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात ऊस उत्पादकांना कमी भाव मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे आता ऊसाच्या दराचा प्रश्न सरकार कसं सोडवतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 11:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close