1 जुलै : येत्या ४ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी अवघी पंढरी नगरी सज्ज झालीय. महाराष्ट्रासह विविध राज्यामधून निघालेल्या दिंड्या आणि पालख्या पंढरपूरच्या वेशीवर येऊन पोहचल्या आहेत. वारकरी भक्तांना आता आस आहे ती श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मंदिरावर यावर्षी प्रथमच मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे. सप्त रंगाच्या लाईटच्या माळा मंदिराच्या चोहोबाजूंनी आकर्षक पद्धतीने लावल्याने या झगमगत्या रंगीबेरंगी रोषणाईत मंदिराचं शिखर, नामदेव पायरीचे महाद्वार, दर्शन मंडप, तुकाराम भवन या सगळ्या मंदिर समितीच्या वास्तू रात्रीच्या अंधारात उजळून निघाल्या आहेत. डोळ्यांना सुखावणारे हे मनमोहक असं दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी मंदिर परिसरात दिसून येते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा