सख्खा भाऊ पक्का वैरी! भावानेच केली भावाची हत्या

या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

News18 Lokmat | Updated On: Jun 6, 2019 04:59 PM IST

सख्खा भाऊ पक्का वैरी! भावानेच केली भावाची हत्या

पंढरपूर, 6 जून : घरगुती कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या भांडणात एका भावाचा मृत्यू झाला आहे. राजेंद्र माळवदकर असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी त्याचा सख्खा भाऊ सचिन माळवदकर याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पंढरपूरमधील संभाजी चौकातील सचिन माळवदकर आणि राजेंद्र माळवदकर या दोघा भावांमध्ये घरगुती कारणावरून बुधवारी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मोठा वाद झाला. भांडणाच्या दरम्यान गळा आवळला गेल्याने राजेंद्र माळवदकर यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर संभाजी चौकात बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेचं वृत्त समजताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या खूनाप्रकरणी भाऊ सचिन यास ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, या दोन भावांमधील वादाचं नेमकं कारण काय होतं, हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही. मात्र भावा-भावाच्या भांडणात एकाला मात्र आपला जीव गमावावा लागला आहे.


Loading...

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलचे दर वाढणार? यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 6, 2019 04:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...