कुठे गेले गोरक्षक? ही गोशाळा की कत्तलखाना?

भुकेने व्याकुळ झालेल्या या गाईंचं कपडे आणि कागदांचे तुकडे खाणं, सर्वत्र पसरलेले शेणाचे ढीग, चिखलाचा राडारोडा अन मेंदूला झिणझिण्या आणणारी दुर्गंधी हे दृश्य आहे पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2018 05:40 PM IST

कुठे गेले गोरक्षक? ही गोशाळा की कत्तलखाना?

सुनील उंबरे, पंढरपूर, 29 जून : भुकेने व्याकुळ झालेल्या या गाईंचं कपडे आणि कागदांचे तुकडे खाणं, सर्वत्र पसरलेले शेणाचे ढीग, चिखलाचा राडारोडा अन मेंदूला झिणझिण्या आणणारी दुर्गंधी हे दृश्य आहे पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील आणि या गाई, भक्तांनी भक्तिभावानं मंदिराला दिलेलं दानं आहेत. रखुमाईला भरलेल्या खणानारळाच्या ओटीतील खण आज या गाईंचे खाद्य बनलेत.

एखादा भाविक जेव्हा मंदिराला गाय दान करतो तेव्हा त्या मागची त्याची श्रद्धा असते आपण दिलेल्या गाईचे दूध देवाच्या अभिषकासाठी वापरले जावे. पण या गाईंचं बहुतांश दूध हे मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि दर्शनाला आलेल्या व्हीव्हीआयपी भक्तांच्या चहापानासाठी वापरलं जातं.

या गोशाळेत कधी काळी पाचशेहून अधिक गाई होत्या.  मात्र मंदिर समितीच्या निष्काळजी कारभारामुळे बहुतांश गाई प्लास्टिक पिशव्या, कपडे, चपला खाऊन मृत पावल्या आहेत.अशा वेळी तथाकथित गोरक्षक आणि गो रक्षणाबद्दल बोलणारे कुठे गेलेत असा प्रश्न भाविक विचारताहेत.

हेही वाचा

हिमाचलमध्ये जोरात पाऊस, रावीचं रौद्र रूप

Loading...

VIDEO : पळा पळा बिबट्या आला! औरंगाबादमध्ये शिवारातच धुमाकूळ

पुन्हा एकदा पाकिस्तानच्या 'चांद नवाब' यांचा व्हिडिओ झाला व्हायरल

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 05:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...