पाली देवस्थानाच्या एसटी स्थानकाची दुरावस्था

पाली देवस्थानाच्या एसटी स्थानकाची दुरावस्था

महामंडळाकडून पालीचा बस थांबा धोकादायक असल्याचा फलकही लावण्यात आलाय. इथल्या थांब्याची इमारत धोकादायक असल्याने या इमारतीजवळ कुणी कँटीनही लावण्यास तयार नाहीये

  • Share this:

पाली,02 नोव्हेंबर: अष्टविनायकांमधील एक जागृत देवस्थान म्हणून कोकणातील पाली प्रसिद्ध आहे. पण .या पाली देवस्थानाच्या एसटी स्टॅन्डची मात्र प्रचंड दुरावस्था झाली आहे.

पाली म्हटलं की सुंदर अशी बल्लाळेश्वर गणपतीची मूर्ती डोळ्या समोर उभी राहते. अष्टविनायकांमधील हे एक जागृत देवस्थान म्हणून याची ख्याती सर्वप्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे भाविक मोठ्या संख्येने येत असतात काही भाविक खाजगी वाहनाने येतात तर काही एसटी बसचा पर्याय निवडतात. एसटी बसचा प्रवास म्हणजे सर्वात सुखरूप प्रवास म्हणून ओळखला जातो पण प्रवास जरी सुखरूप असला तरी पाली शहरातील एसटी थांबा मात्र मोडकळीस आलेला आपल्याला पाहायला मिळतो. पालीला मोठ्या प्रमाणात वर्दळ चालू असते. इथं मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनानेही भाविक येतात. पण महामंडळाकडून पालीचा बस थांबा धोकादायक असल्याचा फलकही लावण्यात आलाय. इथल्या थांब्याची इमारत धोकादायक असल्याने या इमारतीजवळ कुणी कँटीनही लावण्यास तयार नाहीये. या बस थांब्यावर प्रवासी जीव मुठीत धरून उभे असतात. या स्थानकाची महामंडळाकडून लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येते आहे.

काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीसाठी संप झाला.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐरणीवर आल्या होत्या. त्या संपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पाली स्थानकामुळे एसटीच्या स्थानकांचीही किती दुरावस्था झाली आहे हे कळ. तेव्हा एसटीला पूर्वपदावर आणण्यासाठी आणि पाली स्थानकाच्या समस्या सोडवण्यासाठी आता तरी प्रशासन काही करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 08:56 AM IST

ताज्या बातम्या