News18 Lokmat

पालघर नगरपरिषदेत महायुतीचा दणदणीत विजय, पण...

पालघर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने 19 जागांवर विजय मिळवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 01:06 PM IST

पालघर नगरपरिषदेत महायुतीचा दणदणीत विजय, पण...

पालघर, 25 मार्च: पालघर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीने 19 जागांवर विजय मिळवला आहे. सोमवारी नगरपरिषदेच्या 26 जागांचे निकाल जाहीर झाले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या डॉ.उज्ज्वला केदार काळे यांचा विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवार श्वेता पटाील यांचा पराभव केला. नगरपरिषदेसाठी रविवारी 67 टक्के मतदान झाले होते.

नगरपरिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा प्रत्येकी एक-एक उमेदवार हा बिनविरोध निवडून आला होता. त्यामुळे 26 जागांवर निवडणूक लढवण्यात आली होती.  सर्व जागांचे निकाल हाती आल्यानंतर युतीने बाजी मारली असली तरी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा दारुण पराभव जाला आहे. त्यामुळे युतीची अवस्था गड आला पण सिंह गेला अशी झाली आहे.

महायुतीतील शिवसेना, भाजप आणि रिपाइं या पक्षांनी पालघरची निवडणू्क प्रतिष्ठेची केली होती. महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण प्रचारासाठी आले होते. त्यातच पालघरची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरपरिषदेची निवडणूक होत असल्याने महायुती आणि महाआघाडीने पूर्ण ताकद पणाला लावली होती.

असा आहे निकाल

एकूण जागा-26

Loading...

महायुती-19 (शिवसेना-12, भाजप-6)

महाआघाडी- 2 (राष्ट्रवादी-2)

अपक्ष-5

आयात उमेदवाराचा शिवसेनेला फटका

नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेने राष्ट्रवादीकडून आयात उमेदवाराला संधी दिली होती. यामुळे शिवसैनिक नाराज देखील होते. आता निकालानंतर शिवसेनेला याचा फटाक बसल्याचे दिसत आहे.


VIDEO: पवारांनी केलेल्या कौतुकामुळे उदयनराजे भोसले चक्क लाजले!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: palghar
First Published: Mar 25, 2019 12:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...