पालघर आम्हीच जिंकलो, संजय राऊतांनी निकालाआधीच स्वीकारला 'पराभव'

पालघर आम्हीच जिंकलो, संजय राऊतांनी निकालाआधीच स्वीकारला 'पराभव'

  • Share this:

मुंबई, 31 मे :  निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा, सरकारी यंत्रणा यांच्या युतीशी आम्ही लढलोय. पण पालघरमध्ये हा शिवसेनेचाच विजय आहे अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. तसंच 2019 ची निवडणूक स्वबळावरच लढणार असंही राऊतांनी स्पष्ट केलं.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने मैदान मारले. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयाच्या उंबरठ्यावर आहे. गावितांचा विजय निश्चित मानला जातोय.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिलीये.  भाजपने देशातील सर्व निवडणूक आम्ही हरलो तरी चालेल पण पालघर जिंकायची असं ठरवलं होतं. कारण इथं शिवसेनेशी त्यांची टक्कर होती. दोन चार हजारांनी आम्ही मागे पडलो असलो आणि कुणी पुढे गेलं असेल तर राज्याचा निकाल बदलणार नाही असंही राऊत म्हणाले.

तसंच आमची मागणी आहे की मत पत्रिकांच्या माध्यमातूनच निवडणूक झाली पाहिजे. 2019 च्या विजयाची ही सुरुवात आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढू आणि शिवसेनेचंच राज्य येईल असंही राऊतांनी ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 01:21 PM IST

ताज्या बातम्या