Palghar By-election Result 2018: पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी

राजेद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघरच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलंय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 31, 2018 01:54 PM IST

Palghar By-election Result 2018: पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजयी

पालघर, ता. 31 मे : सर्व देशाचं लक्ष्य लागून असलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित विजय झाले आहे. राजेद्र गावित 44589 मतांनी विजयी झाले आहेत. पालघरच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलंय.

आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम राहिली. २८ व्या फेरीत गावित यांना २,६८,१६४ मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना २,४०,६१९ मतं मिळाली. तर तिसऱ्या स्थानावर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना २,१६,९५३ मतं मिळाली. गावित 44589 मतांनी विजयी झाले.

पालघरमध्ये भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघरमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली होती. दिवंगत नेते चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांनी निवडणुकीआधी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेने त्यांना उमेदवारीही दिली. तर भाजपनं काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यानं ही निवडणूक सुरशीची बनली होती. तर बहुजन विकास आघाडीने त्यांचे माजी खासदार बळीराम जाधव यांनाच पुन्हा उमेदवारी देऊन चुरस निर्माण केली होती.

गावित यांच्या विजयामुळे भाजपने शिवसेनेला चांगलाच धक्का दिला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केलीये. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे जल्लोष साजरा न करण्याचा आदेश दिलाय.

 

Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 31, 2018 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...