बहुजन विकास आघाडीची धडपड सुरूच, चिन्हासाठी फेरविचार याचिका दाखल

याआधीच कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेऊनही पदरात निराशाच पडली होती. पण तरीदेखील काही सकारात्मक होईल अशी अपेक्षा बहुजन आघाडीला आहे.

उदय जाधव उदय जाधव | News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2019 01:31 PM IST

बहुजन विकास आघाडीची धडपड सुरूच, चिन्हासाठी फेरविचार याचिका दाखल

पालघर, 15 एप्रिल : 'पालघर लोकसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतरही ते मिळावं यासाठी बहुजन विकास आघाडीने फेरविचार याचिका दाखल केली आहे. मात्र, याआधीच कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे धाव घेऊनही पदरात निराशाच पडली होती. पण तरीदेखील काही सकारात्मक होईल अशी अपेक्षा बहुजन आघाडीला आहे.

सोमवारी पुन्हा एकदा चिन्हावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. थोड्या वेळात या याचिकेवरचा निर्णय पालघर निवडणूक निर्णय अधिकारी भूमिका घेणार आहेत. पालघर जिल्हाधिकारी कार्यलयात या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठरीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीतील सुनावणी नंतरही बहुजन विकास आघाडीचं कितपत समाधान होतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण, आता मतदानाला फक्त 13 दिवसांचा अवधी उरला आहे. एवढ्या कमी वेळात कायदेशीर लढाई लढून मतदारांपर्यंत नेमकं कोणतं चिन्हं पोहोचवायचं यासाठी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे. पण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीचं 'शिट्टी' हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे 'बविआ'ला मोठा धक्का बसला आहे. पालघरमध्ये बहुजन महापार्टीच्या उमेदवारानंही 'शिट्टी' या निवडणूक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र, या संदर्भातला वाद चिघळल्यावर बहुजन विकास आघाडीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली. मुंबई हायकोर्टानं वाद निवडणूक आयोगाकडे सोपवत निर्णयाचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचंही दार ठोठवण्यात आलं. पण, पडद्यामागून शिवसेनेचे ठाण्यातील दिग्गज नेते आणि ‘मातोश्री’चे चाणक्य यांनी किल्ला लढवला. दरम्यान, पहाटे पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं कुणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा सर्वात मोठा फटका थेट बहुजन विकास आघाडीला बसणार आहे. तर, फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे.

हेही वाचा: औरंगाबादमध्ये सत्तारांचं धक्कातंत्र, काँग्रेसला नाही तर 'या' उमेदवाराला पाठिंबा

Loading...

निवडणुकीपूर्वी बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का

लोकसभा निवडणुकीची धामधुम सध्या जोरात सुरू आहे. पण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का दिला. निवडणूक आयोगानं बहुजन विकास आघाडीचं 'शिट्टी' हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे 'बविआ'ला मोठा धक्का बसला.

पालघरमध्ये बहुजन महापार्टीच्या उमेदवारानंही 'शिट्टी' या निवडणूक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र, या संदर्भातला वाद चिघळल्यावर बहुजन विकास आघाडीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली. मुंबई हायकोर्टानं वाद निवडणूक आयोगाकडे सोपवत निर्णयाचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचंही दार ठोठवण्यात आलं. पण, पडद्यामागून शिवसेनेचे ठाण्यातील दिग्गज नेते आणि ‘मातोश्री’चे चाणक्य यांनी किल्ला लढवला.

दरम्यान, पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं कुणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा सर्वात मोठा फटका थेट बहुजन विकास आघाडीला बसला. तर, त्याचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय शिवसेनेच्या पथ्यावर

शिट्टी म्हणजे बविआ हे समीकरण. पण, निवडणूक आयोगानं 'शिट्टी' हे चिन्ह गोठवलं. त्यामुळे मोठा धक्का बहुजन विकास आघाडीला बसला. पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेना विरूद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णय प्रक्रियेत दगा फटका होऊ नये यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी रात्रभर तळ ठोकला होता. मात्र, त्यानंतर देखील 'बविआ'ला फटका बसला. त्यामुळे बहुजन विकास आघाडीला आता मतदारांकडे नवीन निवडणूक चिन्ह पोहोचवण्याची कसरत करावी लागणार आहे.


VIDEO: उर्मिला मातोंडकरांच्या प्रचार सभेत 'मोदी-मोदी'च्या घोषणा, युवकांना मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 01:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...