S M L

पोलीस भरतीच्या 160 जागेसाठी आले 20 हजार उमेदवार; इंजिनिअर, डाॅक्टरांचाही समावेश

तब्बल 33 उमेदवार इंजिनियरिंग झालेले आहेत. 8 आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर बी.एस.सी अॅग्री, बी सी एस, बीएससीटेक यांच्यासह बी फार्म, संगीत पदवीधर, इंटरियर डिझायनर आदींचा समावेश आहे.

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2018 05:42 PM IST

पोलीस भरतीच्या 160 जागेसाठी आले 20 हजार उमेदवार; इंजिनिअर, डाॅक्टरांचाही समावेश

16 मार्च : पालघर जिल्ह्यातील 160 पोलीस शिपाई जागांसाठी जवळपास 20 हजार उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यापैकी 98 उमेदवार उच्चशिक्षित आहेत.

पालघर इथल्या कोळगाव पोलीस परेड मैदानावर सध्या पोलीस भरतीसाठीची शारीरिक चाचणी सुरू आहे.  या पोलीस भरतीत दररोज पंधराशे ते 2500 उमेदवार सहभागी होत आहेत. जवळपास 20 हजार परिक्षार्थींपैंकी तब्बल 33 उमेदवार इंजिनियरिंग झालेले आहेत. 8 आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर  बी.एस.सी अॅग्री, बी  सी एस,  बीएससीटेक यांच्यासह बी फार्म, संगीत पदवीधर, इंटरियर डिझायनर आदींचा समावेश आहे.

या पोलीस भरती साठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून उमेदवार येत असून शारीरिक चाचणी प्रक्रिया पहाटे 4 वाजल्यापासून सुरू होते. या करिता कोळगाव मैदानावर स्टेडियममध्ये तसंच टेंटमध्ये या उमेदवारांची राहण्याची सुविधा करण्यात आली आहे. अनेकदा बाहेरगावाहून आलेले उमेदवार पालघरमधील हॉटेल, गेस्ट हाऊस तर काही चक्क रेल्वे स्टेशनवर आपले वास्तव्य करून पहाटे मैदान गाठताना दिसतात. ठाण्यातही अशीच पोलीस भरती सुरू असून तिथेही हेच चित्र पाहण्यास मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2018 05:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close