नागीन डान्स करत येवल्यात शोरूममधून चोरल्या महागड्या पैठणी, 4 जणांना अटक

येवल्यातील एका शोरूममधून चोरट्यांनी महागड्या पैठणी लांबवून फरार झालेल्या 4 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2019 05:18 PM IST

नागीन डान्स करत येवल्यात शोरूममधून चोरल्या महागड्या पैठणी,  4 जणांना अटक

बब्बू शेख (प्रतिनिधी)

मनमाड, 5 जून- येवल्यातील एका शोरूममधून चोरट्यांनी महागड्या पैठणी लांबवून फरार झालेल्या 4 जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

काय आहे हे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी नागीन डान्स करत येवल्यातील पैठणी शोरूममधून चोरट्यांनी महागड्या पैठणी साड्या चोरून नेल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून फरार झालेल्या 4 जणांना पकडले आहे. 2 आरोपी अद्यापही फरार असूल पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अमोल शिंदे, राजू गुंजाळ, सागर शिंदे व सागर घोडेराव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून 48 पैठणी,12 घागरेसह इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या महिन्यांत या आरोपीनी नागीन डान्स करत पैठणी साड्या चोरताना हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. आरोपींचे 2 साथीदार अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Loading...

दरोडेखोरांच्या निशाणावर काँग्रेसच्या माजी आमदाराचं कुटुंब, बहिणीच्या घरी दरोडा

दरम्यान, मालेगावातील काँग्रेसच्या माजी आमदार आयशा हकीम यांच्या बहीण फातिमा हकीम यांच्या बंगल्यावर दरोडा टाकण्यात आला होता. तसेच कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना मालेगाव शहरातील ताशकंद भागात घडली काही दिवसांपूर्वी घडली होती.

अज्ञात टोळीने घरात घुसून फातिमा हकीम आणि त्यांच्या मुलाला आणि इतर एकाला बेदम मारहाण केली. तसंच पिस्तूलचा धाक दाखवून लाखो रुपयांची लूट करत हे दरोडेखोर तिथून पसार झाले होते. मारहाणीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

या घटनेने ताशकंद परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2019 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...