S M L

तब्बल 107 पुरस्कार मिळवणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांचं निधन

एचएमटी तांदळासह तांदळाच्या 9 वाणांचं संशोधन करणाऱ्या चंद्रपूर दादाजी खोब्रागडे यांचं निधन झालं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 4, 2018 09:18 AM IST

तब्बल 107 पुरस्कार मिळवणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांचं निधन

चंद्रपूर, ता. 03 मे : एचएमटी तांदळासह तांदळाच्या 9 वाणांचं संशोधन करणाऱ्या चंद्रपूर दादाजी खोब्रागडे यांचं निधन झालं आहे. खोब्रागडे यांनी कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केलं आहे. दादाजी खोब्रागडे यांनी एचएमटी तांदळासह तांदळाच्या नऊ वाणाचं संशोधन केल होतं.

गेल्या काही दिवसांपासुन ते आजारी होते. उद्या चंद्रपूर जिल्हयातल्या नांदेड या मुळगावी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. नागभीड तालुक्यातल्या नांदेड गावचे रहिवासी असलेले दादाजी सामान्य शेतकरी असुन त्यांनी संशोधीत केलेले वाणाचे तांदुळ देशभरात वापरले जातात. तांदळावर वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करून तब्बल 107 पुरस्कार दादाजींनी मिळवले आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 3, 2018 09:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close