S M L

वॉटरकप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडीनं मारली बाजी

पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडी (आंधळी) या गावाने बाजी मारलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2018 09:22 PM IST

वॉटरकप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडीनं मारली बाजी

पुणे, ता.12 ऑगस्ट : महाराष्ट्रात जलसंधारणाच्या चळवळीला बळकटी देणाऱ्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातल्या टाकेवाडी (आंधळी) या गावाने बाजी मारलीय. तर दुसरा क्रमांक सातारा जिल्ह्यातल्या भांडवली आणि बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड गावाने तर तिसरा क्रमांक बिड जिल्ह्यातल्या आनंदवाडी आणि नागपूर जिल्ह्यातल्या उमठा या गावाने पटकावला. गेल्या काही महिन्यांमधल्या कामाच्या आढाव्यानंतर ही घोषणा करण्यात आली. पुण्यात झालेल्या एका देखण्या कार्यक्रमात पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार,अशोक चव्हाण उपस्थित होते.

पहिला क्रमांक - टाकेवाडी (आंधळी), जि. सातारा, 75 लाख रूपये आणि स्मृती चिन्ह

दुसरा क्रमांक - भांडवली,जि.सातारा आणि सिंदखेड, जि. बुलडाणा, प्रत्येकी 25 लाख आणि स्मृती चिन्ह.तिसरा क्रमांक - आनंदवाडी, जि. बीड आणि उमठा, जि. नागपूर. प्रत्येकी 10 लाख आणि स्मृती चिन्ह.

वॉटरकप स्पर्धेतल्या विजेत्या गावांना राज्य सरकारनेही पुरस्कार जाहीर केले असून प्रथम क्रमांकाच्या गावाला 25 लाख दुसरा क्रमांक 15 लाख आणि तीसऱ्या क्रमांकाच्या गावाला 10 लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे.

 

Loading...
Loading...

या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी होती. सर्व नेत्यांनी भाषणात टोलेबाजी केल्याने राजकीय नेत्यांची ही जुगबंदी चर्चेचा विषय ठरली.

नेत्यांची जुगलबंदी

राज ठाकरे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणेच फटकेबाजी केली. 1960 ला संयुक्त महाराष्ट्र झाला. इथं दोन्ही पक्षांचे नेते आहेत. जर गेल्या 60 वर्षात सिंचनाचा पैसा मुरला नसता तर राज्याची पाणी पातळी कमी झाली नसती. यावेळी लोकांनी राज ठाकरे यांनी श्रमदानाला यावं अशी मागणी केली. त्यावरही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. मी श्रमदानाला नक्की येईल. मला कुदळ कशी मारायची ते माहित आहे. मात्र फावडं कसं मारायचं ते शिकवाल असं राज यांनी म्हणताच लोकांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला.

अजित पवार : अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आपल्याकडे काही जण बोलघेवडे असतात. त्यांना काहीच करायचं नसतं. ते येतात आणि बोलून निघून जातात. आपल्याकडे एक म्हण आहे, गाव करेल ते राव करेल काय करेल, पण आता ती म्हण बदलली आता मी म्हणतो जे किरण राव करेल तेच आता गाव करेल. आमिर खानने कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाऊ नये. कोणताही शिक्का मारू नये असं केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : राज ठाकरे यांना प्रश्न पडला इतकी वर्षे जल संधारणाचं काम का झालं नाही कारण पाणी अडवा पाणी जिरवा या ऐवजी माणसं आडवा आणि त्यांची जिरवा हेच आत्तापर्यंत झालं. हे समजलं असतं तर प्रश्न पडला नसता. आमीर खान यांनी पाण्याची लोकचळवळ उभी केली. सामान्य माणसांना जागृत केलं. त्यांच काम खूप प्रेरणादायी आहे. येत्या 2,3 वर्षात महाराष्ट्र पाणीदार होईल ,दुष्काळ मुक्त होईल. अनिर्बंध उपसा थांबवला नाही तर पुन्हा दुष्काळात जाऊ म्हणून म्हणून पीक घ्यायचं ते ठरवावं लागेल. पुढचं वर्ष निवडणुकीचं वर्ष असल्याने अमिर खान यांना वॉटर कप घ्यायचा की नाही अशी चिंता आहे. मात्र महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. पाणी प्रश्नी सगळे एक आहेत.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2018 09:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close