400 रुपयांसाठी अडवलं, रुग्णालयाच्या दारातच महिला झाली बाळंतीण

400 रुपयांसाठी अडवलं, रुग्णालयाच्या दारातच महिला झाली बाळंतीण

केवळ 400 रुपये दिले नाहीत म्हणून तिला रुग्णालयाच्या आत घेतलंच नाही. त्यामुळे महिलेची रुग्णालयाच्या आवारातच उघड्यावर प्रसुती झाली.

  • Share this:

बालाजी निरफळ, उस्मानाबाद

28 एप्रिल : प्रसुतीसाठी आलेल्या एका पारधी समाजातील महिलेला डॉक्टरांनी तपासणी करायला उशीर केल्यानं या महिलेची रुग्णालयाच्या आवारातच उघड्यावर प्रसुती झाल्याचा प्रकार उस्मानाबादच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलाय. धक्कादायक म्हणजे या महिलेला 400 रुपयांसाठी अडवून ठेवलं होतं अशी बाब उघड झालीये.

या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून, या प्रकरणी दोषी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी होतीये. सपना अनिल पवार असं या महिलेचं नाव आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी पारधी वस्तीवरील या महिलेला तिच्या नातेवाईकांनी प्रसुतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं होतं. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करण्यास उशीर केला.

केवळ 400 रुपये दिले नाहीत म्हणून तिला रुग्णालयाच्या आत घेतलंच नाही. त्यामुळे महिलेची रुग्णालयाच्या आवारातच उघड्यावर प्रसुती झाली. याबाबत सदर महिलेच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, प्रसुती रुग्णालयानं असा प्रकार घडलाच नसल्याचा दावा केलाय. तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमलीये.

सरकारी हॉस्पिटल्स ही जागोजागी आहेत. पण त्यामध्ये चिरीमिरीसाठी गोरगरीबांची अडवणूक केली जाते. गोरगरीबांची अडवणूक करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर आरोग्यविभाग काय कारवाई असा प्रश्न आता सामान्यांमधून विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 04:31 PM IST

ताज्या बातम्या