उस्मानाबादेत स्वाभिमानी संघटनेनं जाळला सहकार-कृषिमंत्र्यांचा पुतळा

आज तुळजापूर तहसील कार्यालयासमोर सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2017 08:55 PM IST

उस्मानाबादेत स्वाभिमानी संघटनेनं  जाळला सहकार-कृषिमंत्र्यांचा पुतळा

03 नोव्हेंबर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज तुळजापूर तहसील कार्यालयासमोर सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

राज्य शासनाने शेतकऱ्याच्या सोयाबीन उडीद ,मुग या पिकाच्या खरेदीसाठी हमी भाव केंद्र सुरू केली. मात्र खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची प्रचंड अडवणूक चालू आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत पावणे पाच हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद खरेदीच्या नोंदी केल्या. आजतागायत केवळ 250 शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करण्यात आलीये.

त्यातच शासनाने आता एक नवीन परिपत्रक काढलंय. त्यात शेतकऱ्याला सोयाबीन आणि उडीद घालताना मर्यादा घालून दिल्या. त्यात तुळजापुर तालुक्यासाठी उडीद  180 किलो तर मूग 166 किलो अशा मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होतेय. याचं मुद्द्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज हे आंदोलन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 08:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...