आपण सत्तेत आहोत की सत्तेबाहेर ?, शिवसैनिकांचा शिलेदारांना संतप्त सवाल

शिवसेना नेतृत्वाचं सत्तेबाबत जे तळ्यात मळ्यात सुरु आहे ही बाब बहुतेक सामान्य शिवसैनिकांना रुचलेली नाही. उस्मानाबादमध्ये शिवसंपर्क अभियानादरम्यान सामान्य शिवसैनिकांच्या संतापाचा शिवसेनेच्या नेत्यांनाच सामना करावा लागला.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 8, 2017 09:35 PM IST

आपण सत्तेत आहोत की सत्तेबाहेर ?, शिवसैनिकांचा शिलेदारांना संतप्त सवाल

08 मे : शिवसेना नेतृत्वाचं सत्तेबाबत जे तळ्यात मळ्यात सुरु आहे ही बाब बहुतेक सामान्य शिवसैनिकांना रुचलेली नाही. उस्मानाबादमध्ये शिवसंपर्क अभियानादरम्यान सामान्य शिवसैनिकांच्या संतापाचा शिवसेनेच्या नेत्यांनाच सामना करावा लागला. "शिवसेना सत्तेत आहे की सत्तेबाहेर ते आधी आम्हाला कळू द्या" असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी शिलेदारांना विचारला.

उस्मानाबाद जिल्ह्यात चिखली आणि ढोराळा येथे शिवसंपर्क अभियानासाठी शिवसेनेचे नेते पोहोचले असता स्थानिक शेतकरी शिवसैनिकांनी या नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. शिवसेना सत्तेत आहे की सत्तेबाहेर ते आधी आम्हाला कळू द्या अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली.

मध्यावधी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे सगळं सुरू आहे हे आम्हालाही समजतंय असा घरचा अहेर शिवसैनिकांनी शिवसेना नेत्यांना दिला. त्यात मुंबईचे शिवसेना नेते यशोधर फणसे यांची ओळख करून देताना शिवसेनेचे माजी आमदार ओमराजे निंबाळकर चुकले. ओमराजेंनी यशोधर फणसे यांची ओळख शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार अशी करून दिली. वास्तविक आमदार गौतम चाबुकस्वार चिखली गावात आलेच नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2017 09:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...