S M L

उस्मानाबादची उमेदवारी कोणाला मिळणार? गायकवाड आणि निंबाळकर यांच्यात चुरस

शिवसेनेकडे असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी द्यावी की आमदार ओमराजे निंबाळकर यांना याबाबतचा निर्णय पक्षाने अद्याप घेतलेला नाही.

Updated On: Mar 15, 2019 01:05 PM IST

उस्मानाबादची उमेदवारी कोणाला मिळणार? गायकवाड आणि निंबाळकर यांच्यात चुरस

उस्मानाबाद, 15 मार्च: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांनी स्वत:चे पत्ते उघड करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. आघाडीने काही उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी अद्याप युती म्हणजेच भाजप आणि शिवसेनेने उमेदवारांची घोषणा केलेली नाही. काही मतदारसंघातून नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी यावर अद्याप निर्णय झालेला नाही. युतीतील शिवसेनेकडे असलेल्या उस्मानाबाद मतदारसंघातून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांना उमेदवारी द्यावी की आमदार ओमराजे निंबाळकर यांना याबाबतचा निर्णय पक्षाने अद्याप घेतलेला नाही.

रवी गायकवाड यांच्या उमेदारीचे घोडे अडले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उस्मानाबादमधून कोणाला उमेदवारी द्यावी याबाबत मातोश्रीवर बैठक सुरु आहे. रवींद्र गायकवाड यांच्या उमेदवारीला नॉट रिचेबल प्रकरणामुळे शिवसेना पदाधिकारी यांचा विरोध केला आहे. या मतदारसंघातून उमेदवारीसाठी गायकवाड आणि निंबाळकर यांच्यात जोरदार चुरस आहे.

दरम्यान यासंदर्भात आज (शुक्रवारी) पुन्हा एकदा मातोश्रीवर बैठक सुरु आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी उस्मानाबादमधील शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत.


पवारांच्या 'पॉवर'ला घाबरली भाजप, शिवसेनेनंही मैदान सोडलं!

लोकसभा निवडणूकीसाठी भाजप देऊ करत असलेली माढाची २३वी जागा शिवसेनेने नाकारली आहे. माढा मतदार संघासाठी भाजपकडे उमेदवार नसल्यामुळे ती जागा शिवसेनेला देण्यात आली होती. पण ही 23 वी जागा शिवसेनेकडूनही नाकारण्यात आली आहे.

शरद पवार माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील म्हणून शिवसेनेनं जागा नाकरली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेची २३ वी जागा कोणती याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. तर माढातून भाजप किंवा शिवसेनेकडून कोणी उभं राहणार की नाही अशाही चर्चा सध्या सुरू आहे.

Loading...

रणजितसिंह मोहिते पाटील वेटिंगवर

रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने वेटिंगवर ठेवल्याचं चित्र होतं. रणजित सिंह हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भात त्यांनी गिरीश महाजन यांची भेटही घेतली होती. पण मी वैयक्तिक कामासाठी गिरीश महाजन यांची भेट घेतली, असा दावा रणजितसिंह मोहिते पाटलांनी केला होता.

रणजितसिंह भाजपच्या गोटात दाखल झाले तर हा राष्ट्रवादीसाठा मोठा धक्का बसेल. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढणार नसल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी निश्चित मानण्यात येत आहे. तरीही त्यांचा मुलगा भाजपमध्ये जाणार असेल, तर राष्ट्रवादीची मोठी गोची होऊ शकते.

यातच आता भाजपकडून माढ्यात संजय शिंदे यांच्या नावाचाही विचार असल्याची चर्चा होती. संजय शिंदे यांनी मंगवारी रात्री महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह वर्षा बंगल्यावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. संजय शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी अर्धा तास चर्चा केली.


राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक पोहोचले 'ट्रोलर्स'च्या घरी, पुढे काय घडलं? पाहा VIDEOबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 15, 2019 01:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close