S M L

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा उद्या निकाल

Sachin Salve | Updated On: Jun 11, 2018 11:19 PM IST

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा उद्या निकाल

औरंगाबाद, 11 जून : उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करून मोजणी करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिलीय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये विधानपरिषद निकालाच्या अनुषंगाने 5 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

औरंगाबाद खंडपीठाने यातील एक याचिका फेटाळत चार याचिका निकाली काढल्या. तसंच या विधानपरिषदेची मतमोजणी तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय राज्यमंत्र्यांनी अपात्र ठरविलेल्या 10 नगरसेवकांची मते एकत्रित करुन मोजणी करावी असे आदेशही खंडपीठाने दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2018 11:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close