Elec-widget

'...तर अस्थी मातोश्रीवर पाठवणार', आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उद्धव ठाकरेंना इशारा

'...तर अस्थी मातोश्रीवर पाठवणार', आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा उद्धव ठाकरेंना इशारा

दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येला चार दिवस उलटले असले तरीही अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

  • Share this:

उस्मानाबाद, 16 एप्रिल : उस्मानाबाद जिल्ह्यातील दिलीप ढवळे या शेतकऱ्यानं फसवणूक झाल्यानं आत्महत्या केली. या शेतकऱ्याने सुसाईड नोटमध्ये शिवसेनेचे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या नावाचा उल्लेख केला होता. दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येला चार दिवस उलटले असले तरीही अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ढवळे कुटुंबीयांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

'दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येला चार दिवस उलटूनही अद्याप याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली नाही. कारण सर्व नेत्यांना निवडणूकच महत्त्वाची वाटते. याप्रकरणी आता पोलिसांनी आणि प्रशासनाने कारवाई केली नाही, तर भावाच्या अस्थी उद्धव ठाकरे यांचं निवास मातोश्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार,' असा इशाराच ढवळे कुटुंबीयांनी दिला आहे. याबाबत 'लोकसत्ता'ने वृत्त दिलं आहे.

शरद पवारांनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद दौऱ्यावेळी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेत यामागील कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या भेटीबाबत नंतर शरद पवार यांनी माहिती दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

Loading...

"आज उस्मानाबाद दौर्‍यावर असताना समजले की कसबे तडवळे या गांवातील दिलीप ढवळे या शेतकर्‍याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली. कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी मी सहकाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

त्यांनी दाखवलेले कागद पाहता त्यांना न्याय न मिळाल्याने त्यांनी हा टोकाचा मार्ग स्वीकारल्याचे दिसते. जिल्ह्यातील वरिष्ठ पातळीवरील अधिकार्‍यांकडे तक्रार करून ज्यांनी ही परिस्थिती निर्माण केली त्यांची व संस्थांची नावे नमूद केल्याचे पुरावे कुटुंबाकडे आहेत.

मात्र अजून यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. या संदर्भात तातडीने कारवाई व्हावी व उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला शासनाने मोठी आर्थिक मदत जाहीर करावी अशी आमची मागणी आहे," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


SPECIAL REPORT : शेतकऱ्याने केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये आढळलं शिवसेना उमेदवाराचं नाव!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com