S M L

पाच जणांना जीवदान देऊन तो 'जिवंत' !

तेजसच्या आई वडिलांनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय मृत्युनंतरही मृत्यूवर मात करणारा ठरला आहे...त्यामुळे मरावे परी अवयवरुपी उरावे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...

Sachin Salve | Updated On: May 29, 2017 11:08 PM IST

पाच जणांना जीवदान देऊन तो 'जिवंत' !

गोविंद वाकडे,पिंपरी चिंचवड

29 मे : हातातोंडाशी आलेल्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या आईवडिलांची काय अवस्था होत असेल याची कल्पनासुद्धा करवत नाही. पण पिंपरी चिंचवड मधील एका दाम्पत्यानं आपल्या मुलाच्या मृत्युनंतर त्याच्या आठवणींसोबत त्यालाही जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतलाय....त्याचं अवयव दान करून

तेजस म्हस्के, नावाप्रमाणेच तेज असणारा तेजस सोमवारी निस्तेज झाला तो कायमचाच. घराबाहेरच्या एका वळणावर तेजस त्याच्या दुचाकीवरुन घसरला आणि गंभीररित्या जखमी झाला. तेजसला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलं. पण  अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तोपर्यंत त्याचा मेंदू निकामी झाला होता.तेजसनं हेल्मेट घातलं नव्हतं...त्यामुळे त्याचा जीव तर गेला...पण तुमचा वाचवा असं आवाहन त्याच्या बहिणीनं केलंय.

आपल्या एकुलत्या एका मुलाचा ब्रेन डेड झाला हे कळताच म्हस्के कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. पण त्यातून लगेच सावरत त्याच्या कुटुंबियांनी  एक धाडसी निर्णय घेतला.तेजसच्या अवयवदानाचा...

माझी मुलगी अपंग आहे अपनगांच् दुःख मीच समजू शकतो,आज माझा मुलगा गेला पण त्याच्यामुळे इतर 5 जणांना जीवदान मिळाला तो त्यांच्यात जिवंत असेल हे समधान आहे निर्णय घेताना  कोणतिहि अंधश्रद्धा मनात नव्हती.

Loading...
Loading...

तेजसच्या आई वडिलांनी घेतलेला अवयव दानाचा निर्णय मृत्युनंतरही मृत्यूवर मात करणारा ठरला आहे...त्यामुळे मरावे परी अवयवरुपी उरावे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2017 11:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close