पुण्यातल्या 21 वर्षीय तरूणाच्या अवयवदानाने मिळाले 5 जणांना जीवनदान

काल २१ वर्षीय तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रूग्णाचा ब्रेन डेड असल्यामुळे अवयवदानासंदर्भात नातेवाईकांचं समुपदेशन करण्यात आलं. यामुळे ससून रुग्णलयातच एका रुग्णाला किडनी प्रत्यारोपण करण्यात आली

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jan 7, 2018 09:46 PM IST

पुण्यातल्या 21 वर्षीय तरूणाच्या अवयवदानाने मिळाले 5 जणांना जीवनदान

 पुणे, 07 जानेवारी: मृत्यू हा शाश्वत आहे. मात्र पुण्यातल्या एका 21 वर्षीय तरूणामुळे 5 जणांना जीवनदान मिळालंय. पुण्यातील ससून शासकीय हॉस्पिटलमध्ये दुसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झालीय. शासकीय हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणाची सुरुवात ससूनमध्येच झालीय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काल ब्रेन डेड झालेल्या युवकाच्या कुटुंबीय अवयवदान करण्यासंदर्भात तयार झाल्यानंतर या तरुणाचे यकृत ,२ किडनी आणि कॉर्निया प्रत्यारोपणासाठी काढण्यात आल्या होत्या .यामुळे ५ जणांना जीवनदान मिळालं आहे.

पुण्यातील ससून शासकीय रुग्णालय गरीब रुग्णांसाठी नेहमीच तत्पर असतं. गेल्या दोन वर्षांत ससून रुग्णालयात ६ ब्रेनडेड पेशंटचे २१ अवयव दान

करण्यात आलेत. यामुळे २१ जणांना जीवदान मिळालंय. काल २१ वर्षीय तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागल्याने ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रूग्णाचा ब्रेन डेड असल्यामुळे अवयवदानासंदर्भात नातेवाईकांचं समुपदेशन करण्यात आलं. यामुळे ससून रुग्णलयातच एका रुग्णाला किडनी प्रत्यारोपण करण्यात आली. तर इतर अवयव गरजूंसाठी इतर हॉस्पिटलमध्ये देण्यात आल्याची माहिती ससून रुग्णालयाचे डीन डॉ अजय चंदनवाले यांनी दिली. अवयव निकामी झाल्याने अनेक रुग्णांना मृत्यूशी झुंज द्यावी लागते. ६४ वर्षीय भाऊराव पाटील यांची एप्रिल २०१७ मध्ये किडनी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात झाली.

पंचतारांकित रुग्णालयांध्येच लाखो रुपये खर्च करून अवयव प्रत्यारोपण होऊ शकतं हा निव्वळ गैरसमज आहे. कारण कमी पैशात उपचार ससून रूग्णालयात होत आहे आणि महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ इथल्या शस्त्रक्रियांना होतोय.

समाजात अवयव दानासाठी समुपदेशन आणि जनजागृती होणंही गरजेचं आहे...जेणेकरून अनेकांना जीवदान मिळू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 7, 2018 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...