विरोधकांनीच मराठा समाजाला फसविले – तावडे

विरोधकांनीच मराठा समाजाला फसविले – तावडे

मतांसाठी आम्ही निवडणुकीआधी आरक्षण देत नाही, मराठा समाजाला विरोधकांनी फसवलं अशी जळजळीत प्रतिक्रियी विनोद तावडे यांनी दिलीय.

  • Share this:

नारपूर, ता. १८ जुलै : शाहु महाराज योजना आधीच्या सरकारने सुरु केली नाही, तर ती भाजपने सुरु केली आहे. मतांसाठी आम्ही निवडणुकीआधी आरक्षण देत नाही, मराठा समाजाला विरोधकांनी फसवलं अशी जळजळीत प्रतिक्रियी विनोद तावडे यांनी दिलीय. परळीत तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाने सुरु केलेल्या ठिय्या आंदोलनासंदर्भात ते सभागृहात बोलत होते.

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री जोपर्यंत सभागृहात निर्णय देत नाहित तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा पवित्रा परळी येथे सुरु असलेल्या आंदोलकांनी घेतलाय. त्यावर नागपूर येथे भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालयाने निकाल जाहिर केल्यानंतरच त्यावर योग्य तो निर्णय जाहिर करणे शक्य होईल असेही ते म्हणाले. विरोधकांना मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेता आला असता. पण त्यांनी तसे केले नाही. फक्त मतांसाठी त्यांनी मराठ्यांना फसवलं, त्यांचा विश्वासघात केलाय. न्यायप्रविष्ठ असलेल्या मुद्यावर तुर्तास कोणताच निर्णय जाहिर करणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

VIDEO : कोल्ड स्टोरेजमध्ये भीषण स्फोट, 3 ठार

दरम्यान, मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत एकमुखी  हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मुख्यमंत्र्यांना महापूजाही करू देणार नाही असाही निर्णय मराठा मोर्चाकडून घेण्यात आला आहे.

हेही वाचा..

मराठा मोर्चाचं भगव वादळ पुन्हा मुंबईकडे, परळीत ठिय्या आंदोलन

अर्जुन तेंडुलकरने घेतली विकेट, व्हिडिओ पाहून भावूक झाला विनोद कांबळी

छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस निरीक्षक निलंबित

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 04:30 PM IST

ताज्या बातम्या