News18 Lokmat

Opinion Poll 2019 : पश्चिम महाराष्ट्रात 'युती'चेच वर्चस्व, काँग्रेसला भोपळा

पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण 12 जागांवर 'युती'चेच वर्चस्व राहिल असं या सर्व्हेत दाखविण्यात आलंय.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 09:27 PM IST

Opinion Poll 2019 : पश्चिम महाराष्ट्रात 'युती'चेच वर्चस्व, काँग्रेसला भोपळा

मुंबई, ता.27 : मुंबई 27 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आता फक्त 15 दिवस राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ABP आणि C Voter यांचा सर्व्हे बुधवारी प्रसिद्ध झाला. त्या सर्व्हेत महाराष्ट्रातल्या सर्व्हे 42 मतदारसंघाचा कौल दाखविण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण 12 जागांवर 'युती'चेच वर्चस्व राहिल असं या सर्व्हेत दाखविण्यात आलंय. तर राष्ट्रवादीला 3 जागा देण्यात आल्या असून काँग्रेस आपलं खातही उघडू शकणार नाही.

पश्चिम महाराष्ट्र

एकूण जागा - 12

भाजप 04

शिवसेना 04

Loading...

राष्ट्रवादी 03

स्वाभिमानी 01

काँग्रेस 00

..............................

पुणे - भाजप

सोलापूर - भाजप

अहमदनगर -भाजप

सांगली - भाजप

शिरुर - शिवसेना

मावळ - शिवसेना

शिर्डी - शिवसेना

कोल्हापूर - शिवसेना

बारामती - राष्ट्रवादी

माढा - राष्ट्रवादी

सतारा - राष्ट्रवादी

हाकणंगले - स्वाभिमानी

अशा झाल्या २०१४ च्या निवडणुका

2014 मध्ये निवडणूक आयोगाने 5 मार्चला लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत 9 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या. मत मतमोजणी 16 मे रोजी झाली होती. महाराष्ट्रात तीन टप्प्यात 10, 17 आणि 24 एप्रिलला मतदान झालं होतं. 31 मे 2014 ला 15 व्या लोकसभेची मुदत संपली होती. त्या आधी 15 दिवस निकाल जाहीर झाले होते.

2019 ची निवडणूक ही 17 व्या लोकसभेसाठी होत आहे.  2014 च्या निवडणुकीच्या वेळी 81 कोटी 45 लाख मतदार मतदानासाठी पात्र होते. गेल्या पाच वर्षात त्यात 10 कोटी लोकांची भर पडली होती. 2019 मध्ये त्यात आणखी वाढ होणार आहे.

यात 23 कोटी मतदार हे 18 ते 19 या वयोगटातले होते. एकूण मतदारांमध्ये त्यांचं प्रमाण हे 2.7 टक्के एवढं येतं. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी 8 हजार 251 उमेदवार रिंगणात होते. 9 टप्प्यातल्या मतदानाची एकूण सरासरी ही 66.38 टक्के एवढी होती. लोकसभा निवडणुकांच्या इतिहासातलं हे प्रमाण सर्वात जास्त आहे.

NDA ची कामगिरी

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए ने 336 जागा जिंकून इतिहास घडवला होता. 1984 पासून देशात आलेलं हे पहिलच पूर्ण बहुमतालं सरकार होतं. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला फक्त 59 जागा मिळाल्या होत्या. त्यात 44 जागा या काँग्रेसच्याच आहेत.

काँग्रेसला आत्तापर्यंतच्या इतिहासातला सर्वाधिक दारुण पराभव आहे. नियमानुसार विरोधीपक्ष म्हणून स्थान मिळवायचं असेल तर एकूण जागांच्या 10 टक्के म्हणजे 55 जागा मिळविणं अपेक्षीत आहे. मात्र काँग्रेसला तेवढ्याही जागा 2014 मध्ये मिळाल्या नव्हत्या.

VIDEO : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची जुगलबंदी; एकमेकांना कुणा-कुणाची उपमा दिली पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...