उघड्यावर शौचावर बसल्यास दंडात्मक कारवाई-कोल्हापूर पोलिसांचा आदेश

उघड्यावर शौचावर बसल्यास दंडात्मक कारवाई-कोल्हापूर पोलिसांचा आदेश

या कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांचं एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी हा आदेश काढलाय. स्वच्छ भारत मिशनसाठीचं एक पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

  • Share this:

कोल्हापूर,02 ऑक्टोबर: कोल्हापूर क्षेत्रातील पोलिसांनी एक नवा आदेश काढलाय. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर पोलिसांकडून आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांचं एक विशेष पथक तयार करण्यात येणार आहे. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटलांनी हा आदेश काढलाय. स्वच्छ भारत मिशनसाठीचं एक पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. हे पोलिसांचं विशेष पथक ग्रामीण भागात गावोगावी जाणार आहे. जे लोक उघड्या शौचावर बसल्याचे आढळून येतील त्यांच्यावर लगेच दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

आता या कारवाईमुळे तरी उघड्याला शौचावर बसण्याचे प्रमाण कमी होतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कारही जाहीर झाला होता

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2017 03:38 PM IST

ताज्या बातम्या