सध्या चर्चा फक्त उल्हासनगरच्या 'या' पेट्रोल पंपाची!

सध्या उल्हासनगरमधल्या एका पेट्रोलपंपाची भलतीच चर्चा सुरू आहे. एकेकाळी टवाळखोरांच्या धुडगुसामुळे त्या पेट्रोलपंपावर नेहमीच वाद व्हायचे. मात्र आता...

  • Share this:

सध्या उल्हासनगरमधल्या एका पेट्रोलपंपाची भलतीच चर्चा सुरू आहे. एकेकाळी टवाळखोरांच्या धुडगुसामुळे त्या पेट्रोलपंपावर नेहमीच वाद व्हायचे. मात्र आता तिकडे सगळं काही आलबेल असतं. पेट्रोलपंप चालकांनी अशी काय शक्कल लढवली?

इंधन दरवाढीत होणाऱ्या रोजच्या चढ-उतारामुळे पेट्रोल पंप नेहमीच चर्चेचा भाग राहिलेत. मात्र उल्हासनगरमधील एक पेट्रोल पंप वेगळ्याच कारणाने चर्चेत आलं आहे.

उल्हासनगरच्या श्रीराम चौकातलं हे शांता सर्विस सेंटर. या पेट्रोलपंपावर जितकी चर्चा वाढलेल्या इंधन दरांची होत नाही तितकी हे पेट्रोल भरून देणाऱ्यांची होते. आणि का नाही होणार, कारण...

या पेट्रोल पंपावर महिलाराज आहे. अगदी पेट्रोल भरण्यासापासून, पैसे जमा करण्यापर्यंतचं सगळं काम या 11 महिला कर्मचारी करतात, तेही अगदी चोख!

या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी सगळ्या महिला कर्मचारी आहेत. ठाणे जिल्ह्यातील महिला कर्मचारी असलेले हे एकमेव पेट्रोल पंप आहे.

आधी या पेट्रोलपंपावर पुरुष कर्मचारी होते. मात्र अनेकदा ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडायचे. शिवाय अनेक मद्यपी इथं धुडगूस घालायचे. म्हणून 4 महिन्यांपूर्वी इथल्या पेट्रोलपंप चालकानं ही वेगळी शक्कल लढवली.

महिलांनी सूत्र हाती घेतल्यानंतर पेट्रोलपंपावरचे तंटे कमी झालेत. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे या नवदुर्गांच्या कामाचं परिसरात कौतुकही होतं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 07:40 AM IST

ताज्या बातम्या