News18 Lokmat

कांदा चाळीला भीषण आग लागून सुमारे 1 हजार क्विंटल कांदा जळून खाक

कांदा चाळीला भीषण आग लागून सुमारे 1 हजार क्विंटल कांदा जळून खाक झाल्याची घटना सटाण्याच्या जायखेडा येथे सोमवारी सकाळी घडली.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 10:55 AM IST

कांदा चाळीला भीषण आग लागून सुमारे 1 हजार क्विंटल कांदा जळून खाक

बब्बू शेख (प्रतिनिधी)

मनमाड, 21 मे- कांदा चाळीला भीषण आग लागून सुमारे 1 हजार क्विंटल कांदा जळून खाक झाल्याची घटना सटाण्याच्या जायखेडा येथे सोमवारी सकाळी घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत चाळ व त्यातील कांदा जळून खाक झाला होता. कांदा जळाल्याने सोमनाथ ब्राह्मणकर या शेतकऱ्याचे सुमारे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या कांद्याच्या भावात घसरण सुरू असल्यामुळे सोमनाथ यांनी पुढे चांगला भाव मिळेल, या आशेवर चाळीत कांदा साठवून ठेवला होता. मात्र, आगीने सोमनाथ ब्राह्मणकर यांचे होत्याचे नव्हते केले आहे.

VIDEO: लोकसभेच्या मतदानानंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा भडकले

दरम्यान, कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यात साठवलेला कांदा सडू लागल्याने तो फेकून द्यायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली होती. कारण एक-दीड वर्षापूर्वी कांद्याला 40 ते 50 रुपये बाजारभाव मिळत होता. त्यामुळे कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने यंदाच्या वर्षीही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड करण्यात आली. परंतु, कांद्याला किलोमागे दोन ते तीन रुपये असा बाजारभाव मिळत आहे.

Loading...

SPECIAL REPORT: पवारांना मोठा धक्का, मावळमध्ये पार्थचा मार्ग खडतर?

इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने कांद्याच्या पिकाचा झालेला खर्चसुद्धा फिटत नसल्याने भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने कांदा बराकीत साठवून ठेवला होता. सध्या कांद्याला किलोमागे सहा ते सात रुपये बाजारभाव चालु आहे. कांद्याचा बाजारभावच वाढत नसल्याने हा साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी काढला आहे. परंतु शेतकऱ्यांनी साठवलेला कांदा पूर्णपणे सडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले. कांदा उत्पादक साठविलेला कांदा आता विक्रीसाठी काढत आहेत. मात्र, साठवलेला कांदा सडलेला निघत आहे. सडलेला कांदा टाकायचा कुठे? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यापुढे उभा आहे.


घाटकोपरमध्ये भर चौकात तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार, CCTV व्हिडीओ समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 21, 2019 10:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...