S M L

लासलगावमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद

कांदे घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोख पैसै द्यावेत, या साठी लासलगाव बाजार समितीनं कांदा आणि धान्याचे लिलाव बेमुदत बंद केलेत.

Sonali Deshpande | Updated On: Apr 19, 2017 11:28 AM IST

लासलगावमध्ये कांदा लिलाव बेमुदत बंद

19 एप्रिल : कांदे घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोख पैसै द्यावेत, या साठी लासलगाव बाजार समितीनं  कांदा  आणि धान्याचे लिलाव बेमुदत बंद केलेत.

व्यापाऱ्यांकडून दिले जात असलेले चेक महिना-महिना वटत नाहीत. त्यामुळे  शेतकऱ्यांचे हाल होतात, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केलीय.  बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांची होणारी अडचण पाहून लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

शिवाय शेतकऱ्यांचा कांदा कमी प्रतीचा दाखवून वजनात व्यापारीवर्गाकडून जी कपात केली जाते ती अन्यायकारक असून शेतकऱ्यांना नागवणारी आहे, ही कांदा काढणी पध्दत बंद करण्याची मागणी लासलगाव बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी केली.

दुसरीकडे कांदा पध्दत ही नियमाला धरून असून कांदा समिती ते ठरवत असते, त्यामुळे ही पध्दत पूर्वापार चालत आली असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत या कांद्याच्या वादामुळे शेतकरी आणि व्यापारी पुन्हा आमनेसामने आले असून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2017 11:28 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close