पाणी समजून रॉकेल प्यायल्यानं एका वर्षांच्या मुलाचा मृत्यू

पाणी समजून रॉकेल प्यायल्यानं एका वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मात्र रविवारी डॉक्टर नसल्याने चिमुकल्याला दाखल करून घेण्यास अनेक रुग्णालयाने नकार दिला.

  • Share this:

गणेश गायकवाड, प्रतिनिधी


अंबरनाथ, 12 नोव्हेंबर : पाणी समजून रॉकेल प्यायल्यानं अवघ्या एका वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार अंबरनाथ शहरात घडला आहे. कार्तिक सोनावणे असं या चिमुकल्याचं नाव असून तो दिवाळीनिमित्त पुण्याहून अंबरनाथला मामाकडे आला होता.


रविवारी घरात खेळत असताना त्याने  रॉकेल प्यायलं. ही बाब लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी शहरातील अनेक रुग्णालयात फिरवलं. मात्र रविवारी डॉक्टर नसल्याने चिमुकल्याला दाखल करून घेण्यास अनेक रुग्णालयाने नकार दिला.

Loading...शेवटी जियास या खाजगी रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.


दरम्यान, कार्तिकचा मृत्यू हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. डॉक्टरांनी आपल्या बाळावर नीट उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं कार्तिकच्या कुटुंबियांचे  म्हणणं आहे. तर डॉक्टरांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.


=============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...