एकतर्फी प्रेम.. तिनं नकार देताच त्याने थेट नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

एकतर्फी प्रेम.. तिनं नकार देताच त्याने थेट नदीत उडी घेऊन केली आत्महत्या

  • Share this:

सांगली, 30 जून- एकतर्फी प्रेमातून एका 24 वर्षीय तरुणाने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अबरार झाकीर मुलाणी असे मृत तरुणाचे नाव आहे. कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर ही घटना घडली. या वेळी तरुणीही होती. तिच्यासमोरच अबरारने कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली.

काय आहे हे प्रकरण?

अबरारचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याने तरुणीला फोन करुन 'मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे' असे सांगितले. दोघे एका ठिकाणी भेटल्यानंतर त्याने तिला दुचाकीवरुन कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटावर आणले. दोघे घाटावरील पायरीवर बसून बोलत होते. माझं तुझ्यावर प्रेम आहे, असं अबरारने तरुणीला सांगितले. मात्र, तिने त्याचा प्रेमाचा प्रस्ताव फेटाळला. 'आपण दोघे चांगले मित्र आहोत आणि मित्रच राहू', असे सांगितले. परंतु अबरार काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तरुणी त्याची वारंवार समजूत काढत होती. अबरारने तरुणीच्या हातात मोबाइल आणि दुचाकीची किल्ली दिली. दोन मिनिटांत नदीवर जाऊन येतो, असे म्हणला आणि त्या तिच्याकडे पाहात थेट नदीत उडी मारली. तरुणीने आरडाओरडा केली. नदीत पोहणाऱ्यांनी अबरारला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. शहर पोलीस व महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल साडेपाच तासांच्या अबरारचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. तोपर्यंत तरुणी घाटावरच उभी होती. पोलिसांनी तरुणीच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Youtube वर आत्महत्येचा व्हिडीओ पाहून अल्पवयीन मुलीने लावला गळफास

Youtube वर आत्महत्येचा व्हिडीओ पाहून तशीच कृती केल्याने नागपुरात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. शिखा राठोड असं मृत मुलीचे नाव आहे. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हंसापुरी परिसरात ही घटना घडली आहे. गळफास घेण्यापूर्वी शिखा तिच्या लहान बहिणीसोबत मोबाइलवर गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहत होती, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

VIDEO: कंडक्टर मुलीला आंटी म्हणाला आणि बसमध्ये झाला राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2019 09:10 PM IST

ताज्या बातम्या