परभणीत तापमानाचा पारा वाढला.. उष्माघातानं वयोवृद्धाचा मृत्यू

परभणीत तापमानाचा पारा वाढला.. उष्माघातानं वयोवृद्धाचा मृत्यू

परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथील बापुराव मोरे (वय-70) यांचा उष्माघाताने बळी घेतला आहे.

  • Share this:

परभणी, 12 मे- जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथील बापुराव मोरे (वय-70) यांचा उष्माघाताने बळी घेतला आहे. बापुराव मोरे 9 मे रोजी दुपारच्या भरउन्हात शेतामध्ये काम करत होते. त्यानंतर त्यांना उन्हाचा त्रास सुरू झाला. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्यानंतर प्रकृती अधिक बिघडल्याने सकाळी त्यांना जालना येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. त्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बापूराव यांची मुलं उदरनिर्वाहासाठी मुंबई येथे मोलमजुरी करतात. गरीब परिस्थिती असल्याने, ते गुराढोरांसह शेतातच राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले आणि नातवंडे असा परिवार आहे.

मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्याच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तापमानाचा पारा, 47 अंशच्या पुढे जाऊन वापस आला. मागील चार ते पाच दिवसांपासून 42-43 दरम्यान स्थिरावले आहे. वाढलेल्या तापमानामुळे या अगोदरही उष्माघाताने जिल्ह्यात दोन जणांचा बळी घेतला होता. सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यामध्ये मागील एक महिन्यांमध्ये उष्माघाताने दोन जणांचा बळी घेतला. त्यानंतर आता जिंतूरमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे वाढलेल्या उन्हापासून संरक्षण करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

राज्यातील जिल्ह्यांचे तापमान...

अकोला- 43°

अमरावती- 43°

अहमदनगर- 38°

औरंगाबाद-39°

भंडारा-45°

बीड- 42°

बुलडाणा- 43°

चंद्रपूर-45°

धुळे- 40°

गडचिरोली- 44°

गोंदिया-43°

हिंगोली- 43°

जळगाव- 44°

जालना-42°

कोल्हापूर- 37°

लातूर- 43°

मुंबई-31°

नागपूर- 43°

नांदेड- 44°

नंदुरबार- 39°

नाशिक- 38°

उस्मानाबाद-41°

परभणी- 44°

पुणे- 40°

रायगड-36°

रत्नागिरी-32°

सांगली-36°

सातारा- 34°

सिंधुदुर्ग-34°

सोलापूर- 42°

ठाणे- 31°

वर्धा- 42°

वाशिम- 42°

यवतमाळ- 43°


SPECIAL REPORT: 'पोरांची पोटं दुखतात पण तरी मिळेल ते किडे पडलेलं पाणी प्यावं लागतं'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2019 07:05 PM IST

ताज्या बातम्या