या स्मार्ट सिटीत पसरले खड्ड्याचे साम्राज्य..युवकाचा घेतला बळी, अंगावरुन गेला टिप्पर

स्मार्टसिटी असलेल्या सोलापूर शहरात विविध ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. दररोज किरकोळ अपघात होत असतात. मात्र आज या खड्ड्याने अशोक मंजूळकर यांचा बळी घेतला आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 04:57 PM IST

या स्मार्ट सिटीत पसरले खड्ड्याचे साम्राज्य..युवकाचा घेतला बळी, अंगावरुन गेला टिप्पर

सागर सुरवसे (प्रतिनिधी)

सोलापूर,3 मे- स्मार्टसिटी असलेल्या सोलापूर शहरात रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका युवकाचा बळी गेला आहे. अशोक तिम्मा मंजूळकर असे या मृत युवकाचे नाव आहे. अशोक मंजूळकर हा दुचाकीवरून जात असताना रस्त्यावरील खड्ड्यात त्याची गाडी घसरली. तो रस्त्यावर फेकला गेला. तितक्यात मागून आलेला भरधाव टिप्पर त्याच्या अंगावरुन गेला. अशोक यांचे डोके चाकाखाली सापडल्याने मेंदूचा अक्षरश: चेंदीमेंदा झाला. पोलीस हेडकॉर्टरजवळील मुख्य रस्त्यावर ही घटना घडली. अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

स्मार्टसिटीत पसरले खड्ड्याचे साम्राज्य..

स्मार्टसिटी असलेल्या सोलापूर शहरात विविध ठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. दररोज किरकोळ अपघात होत असतात. मात्र आज या खड्ड्याने अशोक मंजूळकर यांचा बळी घेतला आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पाहा..अंगावर शहारे आणणाऱ्या अपघाताचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 3, 2019 04:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close