सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनानं चिरडलं, तीन ठार, ,दोन गंभीर

सप्तश्रृंगीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनानं चिरडलं, तीन ठार, ,दोन गंभीर

चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहानानं चिरडलं. या अपघातात एक ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी भाविकांवर कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांकरीता नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

  • Share this:

नाशिक, 15 एप्रिल- चैत्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहानानं चिरडलं.  या अपघातात तीन ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी भाविकांवर कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांकरीता नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

खालप (ता. देवळा) येथील कळवण शहरापासून चार किमी अंतरावर कोल्हापूर फाटा परिसरात काही भाविक पायी जात होते.  नाशिककडून कळवणकडे येणाऱ्या भरधाव चारचाकीने भाविकांना जोरदार धडक दिली. मृतांमध्ये एका बालकाचा मृत्यु झाला आहे.

दरम्यान, सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव १३ एप्रिल रामनवमीपासून सुरु झाला आहे. खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक देवीच्या दर्शनसाठी गर्दी करीत आहेत तर लाखो भाविक सप्तशृंगी देवीच्या गडाच्या दिशेने पायी येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या