मजुरांना घेऊन टेम्पो चोपड्याजवळ उलटला.. एक जागेवर ठार तर 18 जखमी

चोपडा तालुक्यातील काजीपुरा फाट्याजवळ बुधवारी मालवाहू वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर आहेत.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 08:36 PM IST

मजुरांना घेऊन टेम्पो चोपड्याजवळ उलटला.. एक जागेवर  ठार तर 18 जखमी

राजेश भागवत (प्रतिनिधी),

जळगाव, 1 मे- जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील काजीपुरा फाट्याजवळ बुधवारी मालवाहू वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागेवरच मृत्यू झाला तर 18 जण जखमी झाले आहेत. हे सर्व मजूर आहेत.

मिळालेली माहिती अशी की, सकाळी 9 वाजेच्या सुमारास मालवाहू टेम्पो 30 ते 35 मजुरांना घेऊन अडावदहून शिरपूरकडे जात असताना अचानक उलटला. या अपघातात समोरून येणाऱ्या मोटार सायकलस्वारचा मृत्यु झाला. मालवाहू गाडीतील 18 जण जखमी झालेत.

जखमींमध्ये अझोरुद्दीन हमीद तडवी(वय 18), इर्शाद दमीद तडवी(वय 19), नूरजहाँन हमीद तडवी (वय 48), हमीदाबी रमजान तडवी (वय 45), सिमरन सुपडू तडवी (वय 14), राजू सिकंदर तडवी (वय 22) , हमीदा रमजान तडवी ( वय42), खातूनबी रहेमान तडवी (वय 60) , बतूलबी सुमान तडवी (वय 45), लुकमान अरमान तडवी (वय 25) , हमीदा नत्थु तडवी( वय 34), साहिल सुपडू तडवी ( वय 18), मेहमूदाबी नथ्थु तडवी (वय 40), एनूरबी कलिंदर तडवी (वय 50), शाहिद शरद तडवी (वय 19), शेखर गंभीर तडवी (वय 23) , खातूनबी सायबू तडवी (वय 50)  (सर्व राहणार अडावद ता.यावल) तसेच गोपाल दगडू महाजन (वय 25 रा. किनगाव) यांचा समावेश आहे. दरम्यान, मोटारसायकल वरील मयत तरुणाचे नाव समजू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: one died
First Published: May 1, 2019 08:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...