पुण्यात शुक्रवार पेठेत दोन वाड्यांना आग; एकाचा मृत्यू

पुण्यात शुक्रवार पेठेत दोन वाड्यांना आग; एकाचा मृत्यू

आगीत एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत.

  • Share this:

03 मे : पुण्यातील शुक्रवार पेठेत दोन वाड्यांना आग लागली. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून अग्निशमन दलाचे चार जवान जखमी झाले आहेत.

शुक्रवार पेठेतील एका तीन मजली जुन्या वाड्याला आज (बुधवारी) पहाटे चारच्या सुमारास आगली. वाड्यात कोणीही राहत नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, ही आग शेजारच्या वाड्यापर्यंत पोहोचली. दुसऱ्या वाड्याची आग विझवताना भिंत कोसळल्याने अग्निशमन दलाच्या चार जवानांसह एक स्थानिक नागरिक जखमी झाला. मात्र उपचारादरम्यान नागरिकाचा मृत्यू झाला.

अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने एका वाड्याच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या वाड्याची आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2017 08:44 AM IST

ताज्या बातम्या