दीड वर्षाच्या चिमुरडीला पळवणारा जेरबंद, समोर आली धक्कादायक माहिती

महिन्यांपूर्वी जेजुरी येथील सुरेखा उर्फ लीला विनोद भैसारे यांची दीड वर्षांची कन्या जान्हवीला पळवून नेणारा आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 04:05 PM IST

दीड वर्षाच्या चिमुरडीला पळवणारा जेरबंद, समोर आली धक्कादायक माहिती

बाळासाहेब काळे, (प्रतिनिधी)

पुरंदर, 6 जुलै- महिन्यांपूर्वी जेजुरी येथील सुरेखा उर्फ लीला विनोद भैसारे यांची दीड वर्षांची कन्या जान्हवीला पळवून नेणारा आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सागर पांडुरंग खरात (वय-27, रा.माळेगाव बुद्रुक, ता.बारामती) असे आरोपीचे नाव आहे. पथकाने आरोपीला अटक करून त्याच्याकडून जान्हवीची सूटका केली. नंतर जान्हवीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

31 मे रोजी आरोपीने दीड वर्षांच्या जान्हवीचे जेजुरीतून अपहरण केले होते. या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या गुन्ह्याचा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने जेजुरीतील व जेजुरी बसस्थानकावरील सीसीटीव्हीचे फुटेजची पडताळणी केली असता काळ्या रंगाची पल्सर गाडीवरील आरोपी निश्चित करण्यात आला. त्याचा पथकामार्फत कसून शोध घेतला असता माळेगाव बुद्रुक येथील रहिवाशी आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. तेथे चौकशी केली असता एक महिन्यापासून तो गावी राहत नसल्याचे समजले. खबऱ्यांमार्फत त्याचा शोध सुरू असताना तो हडपसर परिसरात असल्याचे समजले. पोलिसांनी त्यानुसार सापळा रचला असता त्यालाच कोलवडी मांजरी रोड येथे ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती...

आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले की, त्याच्या लग्नाला सात वर्षे झाले तरी त्याला मुलबाळ होत नव्हते. त्यामुळे त्याने हे कृत्य केले. मुलीला पळवून त्याने पत्नीकडे ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलीसह त्याला ताब्यात घेऊन जान्हवी हिला तिच्या आईकडे सूपूर्द करण्यात आले आहे. या घटनेमुळे जेजुरी परिसरात गेले महिनाभर चांगलेच दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2019 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...