शेतीच्या वादातून सख्या भावाने केला बहिणीवर शस्त्राने हल्ला

शेतीच्या वादातून सख्या भावाने केला बहिणीवर शस्त्राने हल्ला

भावाने बहिणीसह तिच्या कुटुंबातल्या अन्य दोघांवरही प्राणघातक हल्ला केला. यात बहिण ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

सुरेश जाधव, आंबेजोगाई 2 जुलै : भाऊ-बहिनीच्या प्रेमळ नात्याला जमिनीच्या वादामुळे ग्रहण लागले आणि राखी बांधून घेणाऱ्या हातानेच कत्तीने वार करत सख्या भावानेच बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अंबाजोगाई तालुक्यातील धायगुड(पिंपळा) येथे ही धक्कादायक घटना घडली. भावाने बहिणीसह तिच्या कुटुंबातल्या अन्य दोघांवरही प्राणघातक हल्ला केला. यात बहिण ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे शेख जानीब यांची साडे चार एकर शेती आहे. त्यांचा भाऊ शेख यासीन शेख गुलामस्तूम यांचं आणि जानीब यांचं शेतीवरून भांडण होतं. हे भांडण वाढत जाऊन दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद निर्माण झाला. त्यांच्यात वारंवार भांडणही होत असंत. या भांडणाचा राग मनात धरून शेख यासीन याने हा हल्ला केला.

VIDEO: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

जानीब या पेरणी आटोपून घराकडे परत येत होत्या. त्यावेळी यासीन तेथे गेला आणि त्याने भांडण केले. भांडण वाढल्याने रागाने त्याने कत्तीने त्यांच्यावर वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांवरही त्याने हल्ला केला.

आंबाजोगाई पोलिसांनी यासीन याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यासीन अजुनही फरार आहे.

राहुल गांधींपूर्वी अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर

गैरसमजातून पतीने केली पत्नीची हत्या

बॅटरी संपल्याने पत्नीचा मोबाइल स्विच ऑफ झाल्याने गैरसमजातून पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नामदेव शंकर गुंजाळ असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.  मध्यरात्री करमाड येथे ही घटना घडली.

मिळालेली माहिती अशी की, नामदेव गुंजाळ यांचे पत्नीशी वाद झाला होता. रागाच्या भरात ती माहेरी निघून गेली होती. 10 दिवसांनी नामदेवने पत्नीला फोन करून घरी येण्याची विनंती केली. पत्नीने देखील ती मान्य करून ती पुण्याहून औरंगाबादला येण्यास तयार झाली. दरम्यान, नामदेवने पत्नीला कॉल केला असता बोलताना तिच्या मोबाइलची बॅटरी संपल्याने तो स्विच ऑफ झाला. पत्नीने जाणूनबुजून मोबाइल बंद केल्याचा गैरसमजातून नामदेवने रागाच्या भरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याहून पत्नी घरी आली तेव्हा पतीने गैरसमजातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने तिला मोठा धक्का बसला. याप्रकरणी करमाड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2019 06:21 PM IST

ताज्या बातम्या