S M L

सहकारी बँकेतील जुन्या नोटा प्रकरणी शरद पवार ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दार !

सहकारी बँकांमधल्या जुन्या नोटांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2018 10:33 PM IST

सहकारी बँकेतील जुन्या नोटा प्रकरणी शरद पवार ठोठावणार सुप्रीम कोर्टाचे दार !

27 फेब्रुवारी : सहकारी बँकांमधल्या जुन्या नोटांच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकांमध्ये पडून असलेल्या जुन्या 500 आणि हजाराच्या नोटा स्क्रॅप करा आणि ताळेबंदात लॉस दाखवा असं रिझर्व बँकेचे आदेश आहेत, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर आता शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार आहे.

सहकारी बँकांमध्ये 500 आणि 1000 च्या नोटांच्या स्वरूपात जवळपास 112 कोटी पडून असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. मात्र या नोटा बदलून देण्यास केंद्र सरकार तयार नाही. याप्रकरणी अर्थमंत्री अरूण जेटलींची 4 वेळा भेट घेतली मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचा दावाही शरद पवारांनी केलाय.

दरम्यान, शरद पवारांच्या वतीनं माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम सुप्रीम कोर्टात बाजू मांडतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2018 10:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close