S M L

नारायण राणेंसारखे त्यागी पक्षात; तर आम्ही मात्र बाहेर-एकनाथ खडसे

लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात एका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 31, 2017 12:23 PM IST

नारायण राणेंसारखे त्यागी पक्षात; तर आम्ही मात्र बाहेर-एकनाथ खडसे

धुळे, 31 ऑक्टोबर: ज्यांनी पक्षामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं आणि सत्ता आणली, ते आज पक्षाबाहेर आहेत आणि नारायण राणेंसारखे त्यागी नेते पक्षामध्ये येत आहेत, अशा बोचऱ्या शब्दात पुन्हा एकदा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. धुळे शहरात एका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यात नारायण राणेंना स्थान मिळण्याची शक्यता आहे. पण खडसेंना काहीच मिळण्याच्या शक्यता धुसर आहेत. राजवाडे संशोधन मंडळातर्फे आणीबाणी-चिंता आणि चिंतनाचा विषय या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी एकनाथ खडसेंसोबत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू हेही उपस्थित होते. पक्षाबाहेर ठेवल्याची आपल्या मनातील खंत एकनाथ खडसे यांनी श्याम जाजू यांच्यासमोर व्यक्त केली. ज्यांना आणीबाणीचा काळ माहिती आहे, असे मोजकेच नेते सध्या भाजपात आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आता फक्त प्रशिक्षणाचीच उरल्याचा टोला लगावत एकनाथ खडसेंनी भाजपचे उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्यासमोरच स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांना चिमटे काढले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 12:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close