पैश्यांसाठी दारुड्या मुलाने केला वृद्ध बापाचा खून

पैश्यांसाठी दारुड्या मुलाने केला वृद्ध बापाचा खून

लक्ष्मण याचं लग्नही झालंय मात्र दारूच्या व्यसनामुळे व सततच्या भांडणाला वैतागून लक्ष्मणाची पत्नी त्याला सोडून माहेरी गेलीय.

  • Share this:

आसीफ मुरसल, सांगली 20 जुलै : पैश्यासाठी एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वाळवा तालुक्यातील चिकुर्डे इथली ही घटना आहे.  विकलेल्या म्हैशीच्या पैश्याच्या वादातून दारूच्या नशेत मुलाने वडिलांचा  दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. हरी पाटील वय-81असं त्या मृत्यू पावलेल्या त्याच्या वडिलांचं नाव आहे. तर लक्ष्मण पाटील असे मुलाचं नाव असून कुरूळप पोलिसांनी लक्ष्मण पाटील याला अटक केलीय.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या चिकुर्डे येथे वृद्ध वडिलांचा दारुड्या मुलाने निर्घुण खून केल्याने गावचं हादरून गेलंय.

गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा, नराधम प्रियकर आणि ब्लॅकमेल करणारा शिक्षक फरार

चिकुर्डे येथील टाकळी वसाहतीत राहणाऱ्या लक्ष्मण याला बऱ्याच वर्षांपासून दारूचं व्यसन होतं. त्यामुळे वेळोवेळी आई वडिलांना तो मारहाण करत होता. तर हरी पाटील हे गेली चार वर्षापासून लकवा झाल्याने अंथरुणात झोपून होते. पती आजारी असल्याने पत्नी ताराबाई यांनी घरातील म्हैस विकली होती. त्यातील 10 हजार देण्याची लक्ष्मणने आईकडे मागणी केली होती. मात्र आई कडून पैसे देण्यात आले नसल्याच्या रागातून लक्ष्मण याने दारू पिऊन वडील अंथरुणावर झोपले असताना लाकडी दांडक्याने डोक्यात व अंगावर जबर मारहाण करून जखमी केलं.

..तर मुले गणपतीला 'एलिफंट गॉड' व हनुमानाला 'मंकी गॉड' म्हणतील- भागवत

जखमी हरी पाटील यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचार सुरू असताना हरी पाटील यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करत लक्ष्मण पाटील याला अटक केली.

लक्ष्मण याचं लग्नही झालंय.  दारूच्या व्यसनामुळे व सततच्या भांडणाला वैतागून लक्ष्मणाची पत्नी त्याला सोडून माहेरी गेलीय. तर दारूच्या पैशासाठी वेळोवेळी आई-वडिलांना तो मारहाण करत होता. यावरून बरेचदा शेजाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्नही केला होता पण फायदा झाला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: murder
First Published: Jul 20, 2019 10:05 PM IST

ताज्या बातम्या