पुण्यात पोलिसांनी 1 कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्त;दोघांना अटक

नोटाबंदीला काही महिने होऊन गेल्यानंतरही नोटांचा काळाबाजार सुरु असल्याचं या प्रकरणामुळे समोर आलंय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2017 03:44 PM IST

पुण्यात पोलिसांनी 1 कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्त;दोघांना अटक

पुणे, 28 जुलै: फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर रिक्षातून जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या एका महिलेला आणि व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी रुपयांच्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. नोटाबंदीला काही महिने होऊन गेल्यानंतरही नोटांचा काळाबाजार सुरु असल्याचं या प्रकरणामुळे समोर आलंय.

गीता शहा आणि छगन राऊत अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर दोघंजण जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावला. जेव्हा रिक्षातून बॅग घेऊन गीता शहा आणि छगन राऊत उतरले तेव्हा पोलिसांनी त्यांना लगेच ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना 1 कोटी रुपयांच्या जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या नोटा व्यावसायातील असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. शहा या येरवड्याच्या रहिवाशी आहेत तर राऊत गणेश पेठेतील रहिवाशी आहेत आणि दोघंही व्यवसायिक आहेत.

आयकर विभागाला या प्रकरणाची माहिती दिली गेली असून डेक्कन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2017 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...