कोकण किनारपट्टीवर ओखी वादळ धडकलं; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

कोकण किनारपट्टीवर ओखी वादळ धडकलं; मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

मालवणमध्ये सिंधू-५ नावाची गस्तीनौका बुडाली. सुदैवानं, या नौकेमधल्या २ पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेत वाचवण्यात यश आलं. मालवण, वेंगुर्ले, देवगड आणि आचरा किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये काल रात्री पाणी शिरलं होतं. आताही तिथे समुद्र खवळलेलाच आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

  • Share this:

04 डिसेंबर:  कोकण किनारपट्टीवर सध्या ओखी चक्रीवादळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसणार नसला, तरी कोकण किनारपट्टीवर कालपासून याचा मोठा परिणाम जाणवतोय.

तामिळनाडू - केरळकडून उत्तरेच्या दिशेने सरकणारे ओखी चक्रीवादळ आणि त्यात तीन डिसेंबरचा सुपरमून याचा संयुक्त परिणाम तळकोकणच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात जाणवलाय. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सिंधुदुर्गातल्या मालवण, वेंगुर्ले, आचरा, देवगड किनारपट्टीवर समुद्राला अचानक उधाण येउन किनाऱ्यालगतच्या अनेक भागात पाणी भरलं. इथल्या मच्छीमारानी वाहून जाणाऱ्या आपल्या होड्या आणि जाळी शर्थीचे प्रयत्न करून वाचवलीयेत.

मालवणमध्ये सिंधू-५ नावाची गस्तीनौका बुडाली. सुदैवानं, या नौकेमधल्या २ पोलीस कर्मचाऱ्यांना वेळेत वाचवण्यात यश आलं. मालवण, वेंगुर्ले, देवगड आणि आचरा किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये काल रात्री पाणी शिरलं होतं. आताही तिथे समुद्र खवळलेलाच आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.

वेंगुर्ले बंदर जेटीवर तर पावसाळ्यात येत नाही इतका समुद्राच्या लाटांचा तडाखा बसला . वेंगुर्लेच्या नवाबाग समुद्रात नांगरून ठेवलेल्या होड्या वाहून किनाऱ्यावर आल्यामुळे मच्छीमार बोटिंच नुकसान झालय. पावसाळ्यासारखी परिस्थिती अचानक ओढवल्यामुळे भयभीत मच्छीमारांनी वाहून जात असलेल्या आपल्या होड्या कशाबशा वाचवल्या. मालवणच्या दांडी भागात उभारण्यात आलेल्या पर्यटन व्यावसायिकांच्या वॉटर स्पोर्टस सेंटर्समध्ये अचानक पाणी भरल्यामुळे या व्यावसायिकांनी धावपळ करून आपली सामुग्री कशीबशी वाचवली आहे.

आचरा गावातही किनाऱ्यालगत असलेल्या पिरावाडी पुलावर समुद्राचं पाणी आल्यामुळे पिरावाडीचा संपर्क तुटला.ओखी चक्रीवादळामुळे कोकणात चिंतेचं वातावरण असलं तरी मुंबईत याचा फारसा परिणाम जाणवणार नाहीये. कारण मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात केवळ तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. ओखी चक्रीवादळाचा केंद्रबिंदू सुरत शहराकडे सरकतोय.  मुंबई, ठाणे आणि उत्तर महाराष्ट्र ओखी वादळ्याच्या प्रभाव क्षेत्रात आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2017 09:02 AM IST

ताज्या बातम्या