लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : शिरुरमध्ये का झाला शिवाजीराव आढळराव यांचा पराभव?

शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे 15 वर्षं खासदार होते. इतकी वर्षं खासदार राहिल्यानंतर मतदारांमधली नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांची मतदारांमध्ये असलेली क्रेझ या गोष्टींमुळेच त्यांचा पराभव झाला, असं म्हटलं जातं.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 07:09 PM IST

लोकसभा निवडणूक निकाल 2019 LIVE : शिरुरमध्ये का झाला शिवाजीराव आढळराव यांचा पराभव?

शिरुर, 23 मे : शिरुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. शिवाजीराव आढळराव पाटील हे 15 वर्षं खासदार होते. इतकी वर्षं खासदार राहिल्यानंतर मतदारांमधली नाराजी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांची मतदारांमध्ये असलेली क्रेझ या गोष्टींमुळेच त्यांचा पराभव झाला, असं म्हटलं जातं.

वादग्रस्त वक्तव्य

एक अनुभवी उद्योजक खासदार अशी शिवाजीराव आढळराव पाटील यांची ओळख होती. पण त्याचबरोबर त्यांनी अमोल कोल्हे यांच्यासंदर्भात जातीवरून वादग्रस्त वक्तव्य केलं. अशा वक्तव्यं त्यांच्यावरच उलटली. याउलट अभिनेते अमोल कोल्हे यांची पाटी कोरी होती. त्यांच्या लोकप्रियतेसोबतच त्यांच्याकडून काही नव्या विकासकामांची अपेक्षा ठेवत मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला. शिवाय महिला आणि तरुण मतदारांवर असलेला त्यांचा प्रभावही त्यांच्या विजयामध्ये महत्त्वाचा मुद्दा ठरला.

'संभाजी' मालिकेमुळे थेट ओळख

संभाजी मालिकेमुळे अमोल कोल्हे हे घराघरात पोहोचले. शिवाय रोड शो आणि भाषणांच्या माध्यमातून ते मतदारांच्या सतत संपर्कात राहिले. शिरुरसोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी उमेदवारांसाठीही रोड शो केले. त्याचवेळी त्यांना विजयाची खात्री होती, असं बोललं जात होतं.

Loading...

विकासकामं रखडली

शिवाजीराव आढळराव यांनी चाकण एअरपोर्ट त्याचबरोबर प्रलंबित रेल्वे प्रकल्प या कामांकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळे मतदारांनी त्यांना कौल दिला नाही, अशी चर्चा आहे. शिरुर मतदारसंघात येणाऱ्या भोसरी, हडपसर या भागांतही त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

अटीतटीची लढत

शिरुरमधली ही निवडणूक शेवटपर्यंत चुरशीची झाली. इथे शिवाजी विरुद्ध संभाजी असा सामना आहे, असं काही जणांनी म्हटलं. त्यावरूनही वाद झाले. पण अखेर या अटीतटीच्या लढतीत अमोल कोल्हेंनी बाजी मारली.

===================================================================================

VIDEO : उद्धव ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ'ची उडवली खिल्ली, 'मातोश्री'वर एकच हास्यकल्लोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 07:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...