Elec-widget

सलग 13व्या दिवशी इंधन दरवाढ, पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढले

सलग 13व्या दिवशी इंधन दरवाढ, पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढले

डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीमुळे मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 26 मे : भारतीयांना इंधनदरांमुळे फटका बसत असला तरीही सलग 13व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. आज सकाळी 6 वाजता पेट्रोलच्या दरात 13 पैशांची वाढ झाली. मुंबईत आज पेट्रोलचा दर आहे 85 रुपये 78 पैसे. तर डिझेल 24 पैशांनी वाढल्यामुळे ते थेट 73 रुपये 20 पैशांवर जाऊन पोहोचलं आहे. दरम्यान, इंधन दरवाढीवर दीर्घकालीन उपाय काढण्यावर काम सुरुय, एवढंच उत्तर केंद्र सरकारकडून मिळतंय.

डिझेल आणि पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीमुळे मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत २० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. गाड्यांच्या भाड्यात वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही २५ ते ३० टक्क्यांनी वाढणार असल्यास दिसतं आहे.

वाशी एपीएमसीमधून भाजीपाला, फळ, कांदा बटाटा, अन्नधान्य आणि मसाला मार्केट मधून माल मुंबई, उपनगर, ठाणे, वसई - विरार ला पोहचवला जातो. २० टक्के भाडेवाढ झाल्याने याचा फटका ग्राहकांना बसणार. मुंबईत भाडेवाढ करण्यात आल्यानंतर काही दिवसात महाराष्ट्र मधील मालवाहतूकीतही भाडेवाढ होण्याची शक्यता..

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 26, 2018 11:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...