S M L

पतंगीच्या काचेच्या मांजावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाची जनहित याचिका

पतंगाला लावण्यात येणाऱ्या मांजाला काच लावल्यास पक्षी, प्राणी आणि माणसाला इजा होऊ शकते. त्यामुळे अशा मांजावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका राष्ट्रीय हरित लवादानं सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

Sachin Salve | Updated On: Jan 6, 2018 07:30 PM IST

पतंगीच्या काचेच्या मांजावर बंदी घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाची जनहित याचिका

06 जानेवारी : संक्रात आली की महाराष्ट्रभर पंतग महोत्सव साजरा केला जातो. खरं तर पंतग उडवायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. पण पतंगाला लावण्यात येणाऱ्या मांजाला काच लावल्यास पक्षी, प्राणी आणि माणसाला इजा होऊ शकते. त्यामुळे अशा मांजावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका राष्ट्रीय हरित लवादानं सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

दरवर्षी पतंगीच्या या मांजामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. बरं फक्त पक्षांनाच नाही तर अनेक माणसांनाही आणि लहान मुलांनाही जखमा होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे अशा मांजावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गेली अनेक वर्ष होते आहे. परंतु ऐन संक्रांतीच्या तोंडावर अशा पद्धतीनं मांजावर बंदी आणल्यास आपल्या व्यवसायाला तोटा सहन करावा लागेल असं मांजा विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

सणाच्या सहा महिने आधी जर अशी बंदी आली असती तर आम्हाला नुकसान टाळता आलं असतं असं मांजा विक्रेत्यांचं म्हणणं आहे. पण पक्षी सुरक्षा आणि मांजा विक्रेत्यांच्या हिताचा विचार करता सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं यावर आता सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 6, 2018 07:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close