शासकीय आणि खाजगी कंपन्यांमध्ये मराठी अनिवार्य, सरकारने काढला जीआर

महाराष्ट्र शासनाने फक्त बँकाच नव्हे, तर अनेक कार्यालयांमध्ये दैनंदिन व्यवहार आणि जाहिरातींमध्ये मराठीची सक्ती केली आहे. यात सरकारी आणि खाजगी, दोन्ही प्रकारच्या कंपन्या आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2017 03:26 PM IST

शासकीय आणि खाजगी कंपन्यांमध्ये मराठी अनिवार्य, सरकारने काढला जीआर

06 डिसेंबर : महाराष्ट्र शासनाने फक्त बँकाच नव्हे, तर अनेक कार्यालयांमध्ये दैनंदिन व्यवहार आणि जाहिरातींमध्ये मराठीची सक्ती केली आहे. यात सरकारी आणि खाजगी, दोन्ही प्रकारच्या कंपन्या आहेत. टपाल कार्यालये, विमान कंपन्या, विमा कंपन्या, गॅस व पेट्रोलियम कंपन्या, कर विभाग, दूरध्वनी कंपन्यासह रेल्वे, मोनो-मेट्रो रेल्वे या सर्वांना हा नियम लागू होणार आहे.

दैनंदिन व्यवहारासह पत्रव्यहार आणि जनसंपर्क, जाहिराती, तिकिटांवर हिंदी इंग्रजीबरोबरच मराठी भाषेचीही सक्ती केलीये. यासाठी शासनाच्या मराठी भाषा विभागाने केंद्र सरकारचे त्रिभाषा सूत्र आणि महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४, सुधारणा २०१५ची आठवण मंगळवारी काढलेल्या आदेशात करून दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत परप्रांतीय फेरीवाल्यांवर तोंडसुख घेतानाच राज्यातील राष्ट्रीय आणि आंतरराज्य बँकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर केला नाही तर मनसे स्टाईने खळखट्याकचा इशारा दिला होता. त्याची अद्याप बँकांनी दखल घेतली नसली तरी  राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेऊन आंदोलनाचे समर्थन करून यापुढे मराठीचा वापर न करणाऱ्या बँकाविरोधात खळखट्याकचा इशारा दिला होता. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले. त्यानंतरही काही बँकांनी त्याला न जुमानल्याने ऐन हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आता महाराष्ट्र शासनाने मंगळवारी तातडीने मराठीचा वापर करण्याची सक्ती करण्याचे हे आदेश काढले आहेत.

काय आहे आदेशात?

जनतेशी करण्यात येणारा पत्रव्यवहार, मौखिक व दूरध्वनी वा अन्य माध्यमांद्वारेच्या संदेशवहनात मराठीचा वापर करावा

Loading...

नावाच्या पाट्या, वृत्तपत्रीय जाहिराती,निर्देश फलकांवर मराठीचा वापर करावा

बँकाचे सर्व दस्तऐवज, रेल्वे, विमान, मोनो-मेट्रोचे आरक्षणाचे अर्ज, तिकिटे, बँकांच्या स्लीप, निवेदनात देवनागरीचा वापर करावा

आॅनलाईन-आॅफलाईन व्यवहारातही मराठीचा वापर करावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 03:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...