3 राज्यांच्या सीमावर्ती भागात माओवादी सक्रीय

आता पूर्व विदर्भासह मध्यप्रदेश छत्तीसगड अशा तीन राज्याच्या सीमावर्ती भागात माओवादी चळवळ सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 13, 2017 11:40 AM IST

3 राज्यांच्या सीमावर्ती भागात माओवादी सक्रीय

13 जुलै : बस्तर आणि गडचिरोली जिल्ह्यात हिंसक कारवाया करणाऱ्या माओवाद्यांनी आता पूर्व विदर्भासह  मध्यप्रदेश छत्तीसगड अशा तीन राज्याच्या सीमावर्ती भागात माओवादी चळवळ सुरू केल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय.

दोन दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले असून पोलिसांनी उद्धवस्त केलेल्या शिबिरात यासंदर्भातले महत्त्वाचे दस्तावेज सापडले आहेत.  त्यात गोंदिया जिल्ह्यासह  मध्यप्रदेशच्या बालाघाट आणि छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्हयाचा नवा विभाग तयार करुन माओवाद्याच्या दोन विस्तारक शस्त्र प्लाटुन या भागात पाठवण्यात आल्या आहेत.

यासाठी प्रशिक्षण देऊन बस्तरमधून चाळीस जणांना या भागात पाठवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2017 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...