पंढरपुरात वारकऱ्यांच्या जिवाला धोका..114 धोकादायक इमारतींना नोटिसा

पंढरपुरात असे तब्बल 114  मठ आणि वाडयांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. शहरातील धोकादायक इमारतींमुळे वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 09:27 PM IST

पंढरपुरात वारकऱ्यांच्या जिवाला धोका..114 धोकादायक इमारतींना नोटिसा

विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 3 जु्लै- आषाढीवारी अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. यात्रा काळात लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. बहुतांश वारकरी हे मठ, मंदिर, धर्मशाळा आणि जुन्या वाड्यांमध्ये राहतात. शहरातील असे तब्बल 114  मठ आणि वाडयांच्या इमारती धोकादायक बनल्या आहेत. शहरातील धोकादायक इमारतींमुळे वारकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत.

आषाढीवारीसाठी राज्याच्या विविध भागातून वारकरी पंढरीत येवू लागले आहेत. वारी काळात हॉटेल, भक्तनिवास, खासगी लॉजेस आतापासूनच फुल्ल झाल्या आहेत. ऐनवेळी पंढरीत येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसरात असलेल्या जूने जीर्ण झालेले मठ आणि खासगी वाड्यांमध्ये आश्रय घ्यावा लागतो. पंढरपुरात असे अनेक जूनेवाडे आहेत. ते आता धोकादायक बनले आहेत. अशा स्थितीत देखील वारकरी आपली जीव मुठीत धरुन राहतात. दरम्यान, पुणे येथे पावसामुळे भिंत कोसळून 15 जण ठार झाले आहेत. यावर्षी ऐन वारीकाळात पाऊस येण्याची शक्यता आहे. पाऊस आला तर आणखी धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील 114  धोकायदायक इमारतीच्या मालकांना त्या पाडण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. परंतु अद्याप एकाही धोकादायक इमारतीवर पालिकेने कारवाई केली नाही. वारी काळात मोठा पाऊस आला तर अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारीकाळात धोकादायक इमारत पडून दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. वेळीच पालिकेने धोकादायक इमारती जमीनदोस्त करुन होणारा अनर्थ टाळावा, अशी मागणी वारकरी भाविकांमधून केली जात आहे.

SPECIAL REPORT: वारीतही लोककलेचा वारसा जपणारे 'वासुदेव'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2019 09:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...