मंजुरी न घेता बँकेची निवडणूक लढवणाऱ्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना नोटीस

मंजुरी न घेता बँकेची निवडणूक लढवणाऱ्या केडीएमसीच्या कर्मचाऱ्यांना नोटीस

शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांचे धाकटे बंधू गोरखनाथ म्हात्रे आणि उदय बनसोडे हे दोन केडीएमसी पालिकेचे कर्मचारी असून त्यांनी निवडणुकीला उभे राहण्याआधी त्यांनी पालिकेची मंजुरी घेतली नव्हती

  • Share this:

कल्याण, 05 मे : सरकारी कर्मचारी असताना पालिकेला कोणतीही माहिती न देता पालिकेची मंजुरी न घेता अभिनव बँकेच्या निवडणुकीला उभे राहिलेल्या दोन उमेदवारांना कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी कारणे दाखवा नोटीस बजावलीये.

शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांचे धाकटे बंधू गोरखनाथ म्हात्रे आणि उदय बनसोडे हे दोन केडीएमसी पालिकेचे कर्मचारी असून त्यांनी निवडणुकीला उभे राहण्याआधी त्यांनी पालिकेची मंजुरी घेतली नव्हती तसंच पालिकेला कळवले नव्हते. त्यामुळे त्यांना आता पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावलीये.

महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम १६ च्या पोट नियम ३ चा भंग केला आहे असा स्वरुपाची ही नोटीस आहे. त्यामुळे सरकारी नोकरी वाचवण्यासाठी हे दोघे उमेदवारी मागे घेतील का?, की नोकरीवर पाणी सोडतील? याकडे सर्वांचे लक्ष लागून या याच मुद्द्यामुळे चर्चेत नसलेली अभिनव बँक निवडणूक चर्चेत आलीये. तर विरोधी पॅनलने हा मुद्दा जोरात उचलून धरला असून या आधारे गोरखनाथ म्हात्रे आणि उदय बनसोडे उमेदवार असलेल्या समर्थ पॅनलला घेरण्याचा प्रयत्न करतायेत. यात त्यांना किती यश येईल हे अभिनव बँकेच्या निवडणूक निकाला नंतर स्पष्ट होईल.

गोरखनाथ म्हात्रे आणि उदय बनसोडे हे दोघे समर्थ पॅनलचे उमेदवार आहेत तर ही निवडणूक मनसेचे माजी आमदार आणि सध्या भाजपात असलेले रमेश पाटील यांच्या अभिनव पॅनल मध्ये चांगली चुरशीची लढत सुरू आहे. मात्र अभिनव पॅनलचे प्रसाद सांगळे हे बिन विरोध निवडून आल्याने अभिनव पॅनेलने आघाडी घेतलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 5, 2018 10:03 PM IST

ताज्या बातम्या