मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या-नितीन गडकरी

देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी संपूर्ण भाजप पक्ष उभा आहे असंही गडकरी म्हणाले.

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2018 11:46 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या-नितीन गडकरी

नागपूर, 27 जुलै : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राज्याचे अनेक जटील प्रश्न सोडवले आहे त्यामुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या आहेत असंही केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. तसंच सामाजिक दृष्ट्या मागास समाजाला आणि आर्थिक दृष्ट्या मागास घटकाला आरक्षण देण्याची घटनेचीच तरतुद आहे, शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर सगळ्यांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे हेच केंद्र आणि राज्य सरकाराची भुमिका असल्याचे  नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

लोकशाहीत आंदोलन करण्याची प्रत्येकाला अधिकार आहे पण मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर जे हिंसक आंदोलन सुरू आहे त्यातून कुणाचेच हित नसल्याचंही नितीन गडकरी म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या आहेत असेही गडकरी म्हणाले.

PHOTOS : एकीकडे दगडफेक,तोडफोड तर दुसरीकडे वर्दीतली आई !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राज्याचे अनेक जटील प्रश्न सोडवले आहे सिंचनासारखा प्रश्न देखील त्यांनी सोडवला आहे, शेतकऱ्यांच्या बाजुने ते सातत्याने उभे राहिले आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्राला विकासाचे मोठ मोठे प्रकल्प आणून राज्याला त्यांनी पुढे नेले आहे. एक अतिशय कर्तृत्ववान मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्यात आपली छाप निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांना बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही गडकरी म्हणाले.

राज ठाकरेंनी बोलू नये आणि राणेंचीही मध्यस्थी नको,मराठा कार्यकर्त्यांनी बजावले

Loading...

देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी संपूर्ण भाजप पक्ष उभा आहे असंही गडकरी म्हणाले. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला माझी अशी विनंती आहे की नेहमी गाव, गरिब आणि  शेतकऱ्यांच्या मागे आमचा पक्ष उभा आहे अशा आमच्या नेत्यांना साथ देण्याचे आवाहनही नितीन गडकरी यांनी केले.

VIDEO : पप्पा नको ना, तरीही निर्दयी बाप मुलीला देत होता मेणबत्तीचे चटके

दरम्यान,  मराठा क्रांती मोर्चानेही एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत जाहीर स्पष्टीकरण द्यावे आता या पुढे कुणाचीही मध्यस्थी खपवून घेतली जाणार नाही असा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीने घेतलाय. या पत्रकात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दोन जणांचा हकनाक बळी गेलाय याला सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस जबाबदार आहे. शांततेनं सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करून आंदोलनाला गालबोट लावले आहे असा आरोपही समितीने केलाय.

तसंच उद्या 28 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही समितीने केलीये. आजपर्यंत आम्ही 58 मुक मोर्चे काढून 58 निवदेनं दिली. सरकारने नेमलेल्या उपसमितीसोबत वारंवार चर्चा केली पण काहीही ठोस निर्णय घेतला गेला नाही. मराठा समाजाच्या भावनाचा आदर करून सरकारने निर्धारीत आणि ठोस लेखी आश्वासन द्यावे अशी मागणीही मराठा समितीने केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 11:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...