किम जाँगची दादागिरी सुरूच, पुन्हा सोडले जपानच्या दिशेनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

किम जाँगची दादागिरी सुरूच, पुन्हा सोडले जपानच्या दिशेनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

या वर्षातली ही उत्तर कोरियाची १५ वी चाचणी आहे.

  • Share this:

29 नोव्हेंबर : उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केलीये. हे क्षेपणास्त्र जपानच्या सागरी हद्दीत जाऊन पडलं. पण आधीच्या चाचण्यांप्रमाणे ते जपानवरून गेलं नाही.

दक्षिण प्यँगॉन प्रांतातून या  क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण केलं गेलं. अमेरिका आणि जपानला धमकावणं, हा या चाचणीमागचा मुख्य उद्देश होता. या वर्षातली ही उत्तर कोरियाची १५ वी चाचणी आहे.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेनं उत्तर कोरियाला दहशतवादाला पाठिंबा देणारं राज्य म्हणून घोषित केलं आणि त्या देशावरचे निर्बंधही वाढवण्यात आले. या चाचणीवर प्रतिक्रिया देताना, आम्ही ही परिस्थिती हाताळू, एवढीच प्रतिक्रिया अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. पण याचा परिणाम होताना दिसत नाहीये. कारण, किम जाँगच्या कुरापती वाढतच चालल्या आहेत, आणि अमेरिकेसारखी महासत्ताही इशारे देण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीये.

बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

- दक्षिण प्यँगॉन प्रांतातून चाचणी

- एक हजार किमीचं अंतर गाठलं

- क्षेपणास्त्र जपानच्या सागरी हद्दीत पडलं

- आधीसारखं हे क्षेपणास्त्र जपानवरून गेलं नाही

- याआधीचं प्रक्षेपण सप्टेंबरमध्ये

- 2017मध्ये क्षेपणास्त्राच्या 15 चाचण्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 09:16 AM IST

ताज्या बातम्या